लवकरच सोलापूर शहरवासीयांना तीन दिवसाआड पाणीपुरवठा होणार..आमदार देवेंद्र कोठे यांनी दिले आश्वासन
सोलापूर: सोलापूर शहर मध्य चे आमदार देवेंद्र कोठे यांनी सोलापूर शहरातील नागरिकांशी आज सकाळी संवाद साधले. अनेक नागरिकांच्या अडचणी त्यांनी जाणून घेतल्या, अनेक अडचणी काही फोनवर सोडवल्या, तर काही जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांना त्यांनी ऑफिसमध्येही त्यानीं बोलून घेतले, काही शिक्षकांच्या अडचणी ही होत्या त्या अडचणी त्यांनी ताबडतोब सोडवल्या, सोलापूर शहरात पाच दिवसात पाणीपुरवठा होत असल्याने नागरिकांची हेळसांड होत असून, त्यांनी सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त सचिन ओंबासी यांना फोन करून कळवले आहे.
दादांच्या ऑफिसमध्ये आलेल्या नागरिकांच्या चेहऱ्यावर आनंद दिसून आला, दादांनी नागरिकांना एकच आश्वासन केले आहे की कोणतेही तुमची अडचण असो माझ्या ऑफिसला फक्त पत्र देऊन जावा, मी तुमचा विषय लवकरच मार्गी लाऊ, अशी आश्वासन शहर मध्ये आमदार देवेंद्र कोठे यांनी नागरिकांची बोलताना व्यक्त केली आहे.