दिनांक २६ जुलै : सोलापूर शहरातील नामांकित एम.आय.टी.विश्वशांती गुरुकुलस्कूलमध्ये कारगिल विजय दिवस उत्साहात साजरा करण्यात आला २६ जुलै १९९९ हा कारगील विजय दिन म्हणून साजरा केला जातो, भारतावर कुरघोडी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या पाकिस्तानला धुळीस मिळवून आपल्या सैनिकांनी पाकिस्तानचा धुव्वा उडवला याचा सार्थ अभिमान सर्व भारतीयांना आहे. त्या कारगिल युद्धामध्ये आपले बरेच जवान शहीद झाले अनेक भारतीयांना प्राण गमवावे लागले होते, परंतु एक इंच ही मागे न हटता पाकिस्तानला आणि पाकिस्तानी घुसखोरांना यमसदनी धाडून पाकिस्तानचे मनसुबे उध्वस्त केले कार्यक्रमाच्या सुरुवात कारगिल युद्धात शहीद झालेल्या सैनिकांना प्राचार्य मनिष पुराणी व सी. आर.पी.एफ चे रिटायर्ड हवालदार अजय शिवशरण समन्वयिका सरस्वती कांबळे, नमिता अथनीकर व सर्व शिक्षक विद्यार्थ्यांनी श्रध्दांजली वाहून मानवंदना दिली. इयत्ता सहावीच्या विद्यार्थ्यांनी पिरॅमिड तसेच सुंदर देशभक्तीपर गीत सादर केले व देशातील जवानांच्या जीवनावर आधारित नाटक सादर करत सुंदर नृत्याविष्कारचे सादरीकरण केले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इयत्ता सहावीचा आरुष दिवटे व वैष्णवी गडदे हिने केले तर आभार प्रदर्शन इयत्ता चौथीची सृष्टी दिवटे हिने केले हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शशिकला वाघमारे, भक्ती माथाडे, वंदना नारा, श्रीशैल हडपद, श्रद्धा पाटील, केतकी धामनगावकर, राहुल जाधव परसराम कोळी यांच्यासह सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यानी परिश्रम घेतले.