येस न्युज मराठी नेटवर्क : भारतीय वेटलिफ्टर्सची कॉमनवेल्थ गेम्स 2022 मधील जबरदस्त कामगिरी कायम असून आता दिग्गज वेटलिफ्टर मीराबाई चानू हीने सुवर्ण पदक भारताला मिळवून दिलं आहे. कॉमनवेल्थमध्ये आज एकाच दिवसातील भारताचं हे तिसरं पदक आहे. मीराबाईने 49 किलो वजनी गटात पदक मिळवलं आहे. एकूण 201 किलोग्राम वजन उचलत मीराबाईनं रेकॉर्डब्रेक कामगिरी केली आहे.
यावेळी मीराबाईने क्लीन अँड जर्कमध्ये 113 किलोग्राम वजन उचललं. त्यानंतर स्नॅच राऊंडमध्ये 88 किलोग्राम वजन उचलत मीराबाईने आपली आघाडी कायम ठेवली. त्यामुळे त्याने एकूण (113+88) 201 किलोग्राम वजन उचलत एक दमदार असा रेकॉर्ड करत मीराबाईने गोल्ड जिंकवून दिलं आहे. टोक्यो ऑलिम्पिकमध्ये रौप्यपदक मिळवणाऱ्या मीराबाईकडून कॉमनवेल्थमध्ये सुवर्णपदकाचीच अपेक्षा होती, जी तिने पूर्ण करत भारतासह स्वत:च्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला आहे.
यंदाच्या कॉमनवेल्थमध्ये भारतीय वेटलिफ्टर जबरदस्त फॉर्ममध्ये दिसत आहेत. आजच्या दिवसात भारताने मिळवलेलं हे तिसरं पदक आहे. आधी संकेत सरगर मग गुरुराज पुजारी यांनी अनुक्रमे रौप्य आणि मग कांस्य पदक मिळवलं.