सोलापूर,दि.28(जिमाका):- अल्पसंख्यांकाना त्यांच्या घटनात्मक आणि कायदेशीर हक्कांबाबत जाणीव करुन देण्यासाठी बुधवार दिनांक 18 डिसेंबर 2024 रोजी जिल्हा नियोजन समितीमार्फत जिल्हा नियोजन समिती कार्यालय, सोलापूर येथे सकाळी 11.00 वाजता कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती जिल्हा नियोजन अधिकारी तथा जिल्हा अल्पसंख्यांक अधिकारी दिलीप पवार यांनी दिली.
अल्पसंख्याक समाजातील नागरिकांना त्यांची संस्कृती, भाषा, धर्म, परंपरा इत्यादीचे संवर्धन करता यावे यासाठी दिनांक 18 डिसेंबर हा दिवस राज्य पातळीवर प्रतिवर्षी “अल्पसंख्याक हक्क दिवस” म्हणून साजरा करणेबाबत राज्यशासनाचे निर्देश आहेत. त्यानुषंगाने सदर दिवशी जिल्हा नियोजन समितीमार्फत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याचे जिल्हा नियोजन अधिकारी तथा जिल्हा अल्पसंख्यांक अधिकारी श्री पवार यांनी सांगितले.