येस न्युज मराठी नेटवर्क ; महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या ४ रिक्त सदस्यांच्या नियुक्तीसाठीची फाईल राज्य सरकारकडून राज्यपालांकडे पाठवण्यात आली आहे. MPSC च्या उमेदवारांची भरती प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी त्यांची मुलाखत प्रक्रिया पार पडणे गरजेचे आहे. या मुलाखत प्रक्रियेला वेग येण्यासाठी आयोगातील रिक्त पदांवर तातडीने नियुक्ती होणे आवश्यक आहे. म्हणून यानिमित्ताने आज सामान्य प्रशासन राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेऊन एमपीएससी च्या ४ सदस्य नियुक्तीची फाईल मंजूर करावी,अशी विनंती केली. या विनंतीला सकारात्मक प्रतिसाद देत राज्यपाल यांनी आजच फाईलला मंजुरी देऊन ती सरकारकडे पाठवणार असल्याचे सांगितले आहे.