येस न्युज मराठी नेटवर्क : मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या वेगाने वाढत आहे. काल, गुरुवारी मुंबईत एकाच दिवशी २० हजारांहून अधिक करोना रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे मुंबईत करोनाची तिसरी लाट अटळ असल्याचे चित्र आहे. या पार्श्वभूमीवर मुंबईत कठोर निर्बंध लागू करण्यात येणार आहेत. संपूर्ण लॉकडाउन नाही तर, मिनी लॉकडाउन लागू शकतो, अशी दाट शक्यता आहे. मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी आज, शुक्रवारी याबाबतचे संकेत दिले आहेत.
मुंबईत करोना रुग्णांची संख्या गेल्या काही दिवसांपासून वेगाने वाढत आहे. आता करोना रुग्णांचा आकडा २० हजारांपल्याड पोहोचला आहे. या पार्श्वभूमीवर मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी आज, शुक्रवारी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना मुंबईतील परिस्थितीची माहिती दिली. संपूर्ण लॉकडाउन लागू करणार नाही, असे त्यांनी सांगितले. मात्र, कठोर निर्बंध अर्थात मिनी लॉकडाउन लावला जाऊ शकतो, असे संकेत त्यांनी दिले. नवीन निर्बंधांबाबतची नियमावली आज संध्याकाळी सात वाजेपर्यंत जाहीर करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.