सोलापूर : सोलापूरच्या जेलरोड पोलिस ठाण्याच्या हद्दीत रेल्वेमध्ये नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवत बेरोजगार तरुणांची फसवणूक झाल्याचे स्पष्ट झाले आहे .एका घटनेत अकबर मौला करीम शेख यांच्या मुलाला रेल्वेमध्ये नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवत दहा ऑगस्ट 19 पासून एक लाख 49 हजार 800 रुपयांची फसवणूक झाल्याची तक्रार दाखल करण्यात आली आहे. दयानंद कॉलेजजवळील बनसोडे आणि भाषा पेठ येथील आम्ही नेली रियाज अहमद चौकी या दोघांविरुद्ध भारतीय दंड विधान कलम 307 341 143 144 147 149 आणि 504 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जेलरोड पोलिस ठाण्याच्या हद्दीत गौरीशंकर शरणाप्पा भाई कट्टी यांच्या मुलाची गेल्या वर्षभरापासून 7 लाख 50 हजार रुपयांची लुबाडणूक करण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे. यापैकी चार लाख रुपये आरोपींनी परत केले असून उर्वरित तीन लाख 46 हजार रुपये परत मिळावेत यासाठी गौरीशंकर भाईकट्टी यांनी जेलरोड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली असून कल्याण येथील सुनील सौंदणे मुंबई तील सुरेश शर्मा आणि अजिंक्य बाळे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादीत भाईकट्टी आणि जोड बसवन्नाचौकातील आंध्रा बँकेच्या शाखेतून पैसे पाठवण्याचे तक्रारीत म्हटले आहे.