घराबरोबर अंगण व परिसर स्वच्छ ठेवा- जिल्हाधिकारी कुमार आशिर्वाद
सोलापूर – स्वच्छता ही सेवा मोहीम आद तालुक्यातील सर्व गावांमध्ये “एक तारीख एक तास” या मोहिमे खाली स्वच्छतेसाठी लाखो हात झटले.. हजारो टन कचरा गोळा करणे बरोबर आबाल वृध्द, अपंग या स्वच्छता मोहिमेत सहभागी झाले होते. दरम्यान आज जिल्हा परिषद आवार व मंदिर परिसरात घेणेत आलेल्या स्वच्छता मोहिमेत जिल्हाधिकारी कुमार आशिर्वाद यांनी स्वत हातात. झाडू घेऊन परिसर स्वच्छ केला तर हातात हॅन्डग्लोज घालून कचरा उचलला. आपले घराबरोबर परिसर देखील स्वच्छ ठेवा असे आवाहन आज जिल्हाधिकारी कुमार आशिर्वाद यांनी जिल्हा वासियांना केला.
स्वच्छ भारत मिशन ग्रामीण टप्पा 2 अंतर्गत स्वच्छता ही सेवा हा उपक्रम दिनांक 15 सप्टेंबर 2023 ते 02 ऑक्टोबर 2023 या कालावधीमध्ये राबविण्यात येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहनानुसार आज दिनांक 01 ऑक्टोबर 2023 रोजी सकाळी 10.00 ते 11.00 वा. या वेळेत जिल्हातील प्रत्येक तालुक्यामधील प्रत्येक गावात एक तास स्वच्छतेसाठी श्रमदान मोहीम राबविणेत आली.
जिल्हा स्तरावर घेणेत आलेले मोहिमेत जिल्हाधिकारी कुमार आशिर्वाद, कार्यकारी अधिकारी इशाधिन शेळकंदे व पाणी व स्वच्छतेचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल जाधव, स्वच्छ भारत मिशन चे ब्रॅन्ड अॅम्बेसिडर सचिन खरात, शिक्षणाधिकारी प्रसाद मिरकले,जिल्हा आरोग्य अधिकारी डाॅ. संतोष नवले, कार्यकारी अभियंता संतोष कुलकर्णी .कार्यकारी अभियंता नरेंद्र खराडे, अधिक्षक अनिल जगताप, कक्ष अधिकारी विवेक लिंगराज, कक्ष अधिकारी अविनाश गोडसे, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक सचिन जाधव, जिल्हा परिषदेतील युनियनचे डॉ. एस.पी माने,जहीर शेख, सचिन घोडके, महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय बहुजन कर्मचारी संघटनेचे कोषाध्यक्ष संतोष जाधव, रणजित गव्हाणे,,सादिक शेख, राज उपासे ,वसंत काळे आदी कर्मचारी उपस्थित होते.
एक तास स्वच्छतेसाठी झटले लाखो हात .. !
या स्वच्छता मोहिमेत सहभागी व्हावे असे आवाहन सिईओ मनिषा आव्हाळे यांनी केले होते. या आवाहनास जिल्हयात भरभरून प्रतिसाद मिळाला.
जिल्हात आज ११ तालुक्यातील १०१९ ग्रामपंचायती मधील ११४१ गावाच स्वच्छता मोहिम राबविणेत आली आहे. एक तास स्वच्छतेसाठी म्हणून आलेल्या ग्रामस्थांनी तसेच जिल्हा परिषदेचे सर्व विभागाचे अधिकारी व कर्मचारी यांनी जोन तासा पेक्षा अधिक काम सुरू ठेवले. अनेक ठिकाणी पडत्या पावसात श्रमदान केले. सर्व गटविकास अधिकारी यांनी गेल्या तीन दिवसा पासून चांगले नियोजन केले होते. त्यामुळे स्वच्छता श्रमदानाचा मेसेज सर्व लोका पर्संत जाणेस मदत झाली.
पर्यटन स्थळाची स्वच्छता..!
सोलापूर शहारात सिध्देश्वर मंदिराकडे जाणारे अडुसष्ठ लिंग पैकी जिल्हा परिषद आवारात असलेले ठिकाणी जिल्हाधिकारी कुमार आशिर्वाद यांचे सह अधिकारी व कर्मचारी यांनी स्वच्छता केली. संत गाडगे बाबा की जय, स्वच्छ गाव सुंदर गाव, प्लास्टिक मुक्त गाव करा. ! स्वच्छ कार्यालय सुंदर कार्यालय या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला. जिल्हा परिषद मुख्यालयातील विभाग प्रमुख व कर्मचारी यांनी छत्रपती शिवाजी उद्यान, रंगभवन ते जिल्हा परिषद मार्ग, काॅग्रेस भवन समोरील अडुसष्ठ लिंग परिसराची स्वच्छता केली. प्लास्टिक, गुटख्याच्या पुड्या, कागद व पाला पाचोळा एकत्रित करणेत आला.
जिल्ह्यातील विविध पर्यटन स्थळांची देखील स्वच्छचा करणेत आली.
गावानजीक असलेले रेल्वे ट्रॅक आणि स्थानके आणि आजूबाजूचा परिसर, रस्त्याच्या कडेला, पाणवठे, घाट, झोपडपट्ट्या, पुलांखालील, बाजाराची ठिकाणे, बॅकलेन्स, प्रार्थनास्थळे, सार्वजनिक आणि खाजगी कार्यालयांच्या आजूबाजूचे क्षेत्र, पर्यटकांची ठिकाणे, बस स्टँड आणि टोल प्लाझा, वन्यजीव क्षेत्र, गोशाळा, टेकड्या, निवासी क्षेत्रे, आरोग्य संस्था आणि लगतचे क्षेत्र, अंगणवाड्यांभोवतीचे क्षेत्र, शाळा आणि महाविद्यालयांच्या आसपासचे क्षेत्राचे परिसरात ही स्वच्छता मोहिम घेणेत आली. स्वच्छतेसाठी श्रमदान मोहिमेत सरपंच, ग्रामसेवक. ग्राम विकास अधिकारी, सर्व ग्रामपंचायत सदस्य, महिला बचत गट, युवक युवती मंडळे, शालेय विद्यार्थी, ग्रामस्तरीय अधिकारी, कर्मचारी बीआरसी व सीआरसी सहभागी झाले होते.
एक तास स्वच्छते साठी मिनिट टू मिनिट नियोजन ..!
विशेष मोहिमे साठी मुख्य कार्यकारी अधिकारी मनिषा आव्हाळे यांचे मार्गदर्शना खाली अतिरीक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिणकर,उप मुख्य कार्यकारी इशाधिन शेळकंदे, उप मुख्य कार्यकारी अधिकारी (पाणी व स्वच्छता) अमोल जाधव यांचे मार्गदर्शनाखाली जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक सचिन जाधव, संवाद सल्लागार सचिन सोनवणे, मनुष्यबळ सल्लागार शंकर बंडगर, क्षमता बांधणी सल्लागार महादेव शिंदे, जिल्हा पाणी गुणवत्ता सल्लागार दिपाली व्हटे, सनियंत्रण सल्लागार यशवंती धत्तुरे, वित्त व संपादणूक सल्लागार अर्चना कणकी, घनकचरा सल्लागार मुकूंद आकुडे, अल्फिया बिराजदार, यांचे सह सर्व विस्तार अधिकारी पंचायत, ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी व सरपंच , सिंह. ग्राप चे कर्मचारी, बीआरसी , जलसुरक्षक व सीआरसी , उमेद, आरोग्य विभाग तसेच महिला व बाल कल्याण यांचे सह सर्व विभागाचे विभागाचे सर्व कर्मचारी या मोहिमे साठी प्रयत्न केले आहेत. .