मार्डी – घे भरारी महिला ग्रामसंघ मार्डी ,तालुका उत्तर सोलापूर, जिल्हा सोलापूर येथे कृषी दिनाचे औचित्य साधून “उमेद” अभियानाचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रकल्प संचालक अर्जुन गुंडे यांनी प्रत्यक्ष भेट दिली. ग्रामसंघाच्या ऑफिसमध्ये पाहुण्यांचे स्वागत, प्रतिमापूजन, दीप प्रज्वलन, प्रमुख पाहुण्यांचा सत्कार पार पडला. प्रमुख पाहुणे यांनी महिलांना सामूहिक उद्योग उभारणीसाठी व मिळालेल्या निधीचा योग्य वापर करण्यावर मोलाचे मार्गदर्शन केले. गावातील समूहांच्या उद्योगव्यवसायांना प्रत्यक्ष भेट देऊन त्यांच्या वाटचालीचा आढावा घेतला. त्याच बरोबर प्रदर्शनीय पोषण परस बागेची एकंदरीत पाहणी करण्यात आली .आठवड्यातील सात दिवस 7 पालेभाज्यांचा आहारात समावेश व्हावा यासाठी सात वाफ्याची परसबाग बनवण्यात आली. पोषण परसबागेस भेट देऊन आजच्या या धावत्या युगात पोषण परस बागेचे महत्व सांगितले.
कृषी दिनाचे औचित्य साधून परस बागेचे ठिकाणी अर्जुन गुंडे यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले .सदर भेटीस “उमेद”अभियानाचे जिल्हा अभियान व्यवस्थापक मीनाक्षी मडीवळी, तालुका अभियान व्यवस्थापक श्रीमती. पुनम दुध्याल, सादिक शेख उपसरपंच युवराज पवार, ग्रामसेवक प्रवीण विभूते , कृषी व्यवस्थापक अविनाश माने, श्रीरंग मसल खांब , पशु सखी रूपाली धावणे, ग्राम संघाच्या अध्यक्षा अनिता सुरवसे, कोषाध्यक्षा वृषाली पवार , सीआरपी अपर्णा देशमुख, रोहिणी जगताप त्याच बरोबर समूहातील महिला उपस्थित होत्या.
