सोलापूर : जिल्यातील मच्छिमारांसाठी किसान क्रेडिट कार्ड वाटप करून मच्छिमारांना लागणाऱ्या भाग भांडवलासाठी जास्तीत-जास्त रक्कम मच्छिमारांना मिळण्यात यावी. यासाठी मंगळवार दि. १५ फेब्रुवारी रोजी करमाळा मतदारसंघाचे पाणीदार आमदार संजयमामा शिंदे यांनी जिल्हाधीकारी मिलिंद शंभरकर यांच्याशी चर्चा करण्यात आली.
यावेळी उजनी जलाशयात मच्छी बियाणे सोडण्यात यावे. परप्रांतीय मच्छीमारांवर कडक कारवाई करण्यात यावी.व मच्छिमारांना शासकीय योजनांचा पुरेपूर लाभ मिळण्यात यावा.याविषयी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्याशी चर्चा करण्यात आली. यावेळी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी बँक कर्मचाऱ्यांशी किसान क्रेडिट कार्ड संदर्भात मच्छीमारांना पुरेपुर फायदा मिळण्यात यावा असे सांगितले.
यावेळी मस्त्य आयुक्त महाडिक साहेब, लीड बँकेचे अधिकारी कथिकर साहेब, जि. भ. स. बँकेचे अधिकारी मोठे, मच्छिमार कृती समितचे कोषाध्यक्ष नंदकुमार नगरे, टायगर ग्रुपचे मोहन नगरे, जय मल्हार क्रांती संघटनाचे उपाध्यक्ष अंकुश जाधव, हनुमंत मल्लाव, अजिनाथ कनिचे, गणेश भोई, मिठू तसेच दत्ता भुई, अंकुश जाधव सर, संजूदादा भोई, जयराम भोई, रमेश भोई, उत्तम सल्ले, चंद्रकांत भोई, हनुमंत भोई तसेच बेगमपुर, देगांव व सोलापूर जिल्ह्यातील मच्छिमार बांधव उपस्तित होते.