सोलापूर : सोलापुर सिंचन भवन येथे मोहोळ मतदारसंघातील सिना भोगावती जोड कालवा संदर्भात व आष्टी उपसा सिंचन योजनेतून अनगर, देवडी, वाफळे,खंडोबाची वाडी, कोंबडवाडी, नालबंदवाडी, वडाचीवाडी, हिवरे कुरणवाडी या गावाच्या पाणी प्रश्न संदर्भात तसेच भिमा नदीवर बॅरेज बंधारे बांधणे संदर्भात माजी आमदार राजन पाटील, आमदार यशवंत माने व जिल्हा परिषद सदस्य बाळराजे पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत व भिमा कालवा मंडळ सोलापूर अधीक्षक अभियंता बागडे व भिमा कालवा लाभ क्षेत्र विकास प्राधिकरण सोलापूरचे अधीक्षक अभियंता साळे तसेच आष्टी उपसा सिंचन योजनेचे कार्यकारी अभियंता नारायण जोशी व कार्यकारी अभियंता स्नेहल गावडे व शेतकऱ्याच्या समवेत सकारात्मक बैठक पार पडली.
दोन्ही योजना लवकरात लवकर मार्गी लावण्यासंदर्भात मुंबई येथे उपमुख्यमंत्री अजित पवार व जलसंपदा मंत्री जयंतराव पाटील यांच्या समवेत संबंधित अधिकारी यांची बैठक आयोजित करण्यात येणार आहे. असे ही यावेळी आमदार यशवंत माने यांनी सांगितले. यावेळी हनुमंत बप्पा पोटरे, जगन्नाथ कोल्हाळ,सोपान कादे,गोविंद पाटील,बबनराव दगडे,राजकुमार पाटील,अनिल कादे गुरुजी,अमोल कादे,विजयकुमार पोतदार,रामचंद्र क्षिरसागर ,नारायण गुंड ,किसन गुंड,प्रवीण शिंदे सह अन्य शेतकरी उपस्थित होते.