कोल्हापूर: कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी कोल्हापूरच्या दौऱ्यावर असलेल्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सोमवारी श्रीमंत शाहू छत्रपती यांची भेट घेतली. न्यू पॅलेस येथे ही भेट होत आहे. या भेटीवेळी संभाजीराजे छत्रपती यांचे बंधू आणि माजी आमदार मालोजीराजे हेदेखील उपस्थित आहेत. मराठा आरक्षणावर खासदार संभाजीराजे यांनी घेतलेल्या आक्रमक भूमिकेच्या पार्श्वभूमीवर ही भेट अत्यंत महत्वाची मानली जात आहे. त्यामुळे आता या भेटीत काय घडणार, याची उत्सुकता सर्वांना लागली आहे.
अजित पवार आणि श्रीमंत शाहू छत्रपती यांची ही भेट नियोजित नव्हती. आज सकाळी अजित पवार अचानकपणे शाहू छत्रपती यांच्या भेटीसाठी न्यू पॅलेस येथे दाखल झाले. गेल्या पाऊणतापासून ही बैठक सुरु आहे. या बैठकीला मराठा समाजाचे काही नेतेही उपस्थित असल्याचे समजते. 16 जूनला कोल्हापुरातून मराठा मोर्चा काढण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर या बैठकीत काय घडणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.