मोडनिंब : एलआयसी मध्ये सर्वोच्च समजला जाणारा ‘एमडीआरटी’ (अमेरिका) हा आंतरराष्ट्रीय पुरस्कार प्रमुख सल्लागार प्रकाश सुरवसे यांना जाहीर झाल्याबद्दल त्यांचा मोडनिंब येथे सत्कार करण्यात आला.अमेरिकेत होणाऱ्या आर्थिक विमा प्रतिनिधींच्या महासंमेलनासाठी विमा प्रतिनिधी सुरवसे यांची निवड झाली आहे. सोळा वर्षांपासून पासून ते एलआयसीचे काम करीत आहेत. २०२३ मध्ये त्यांनी ‘एमडीआरटी’ या सर्वोच्च पुरस्कारासाठी चे उद्दिष्ट पूर्ण केले. जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर त्यांनी इतर एजंटांना आदर्श ठरेल अशी कामगिरी केली आहे.
बार्शी शाखेचे शाखाधिकारी तुषार घाटगे, टेंभुर्णी शाखेचे कॅशियर विवेक बंदुके, सेवानिवृत्त विकास अधिकारी दत्तात्रेय लंगोटे, उमेश पोतदार, मिशन ‘एमडीआरटी’ क्रिएटिव्ह ग्रुपचे निळकंठ ताकमोगे, रमेश गिरी व त्यांच्या टीमने विशेष सत्कार केला. मोडनिंब येथे माजी जिल्हा परिषद सदस्य शिवाजी कांबळे यांच्यासह शिवाजी सुर्वे, दिग्विजय कांबळे, शितल महाडिक, धनंजय महाडिक यांनी फेटा बांधून पुष्पगुच्छ देऊन कौतुक केले. हजारो नागरिकांना विम्याचे महत्त्व एलआयसीच्या माध्यमातून सांगून त्यांना बचत आणि सुरक्षा मिळवून देण्याची महत्त्वपूर्ण अशी कामगिरी केल्यामुळे विमा प्रतिनिधी सुरवसे यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.