सोलापूर –सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने श्री गणेश विसर्जनच्या नियोजना करिता आज सिद्धेश्वर तलाव येथील विष्णू घाट, गणपती घाट, हिप्परगा येथील दगडीखान रामलिंग नगर येथील विहीर , जुनी मिल कंपाऊंड मधील जुनी विहीर , लक्ष्मी-विष्णू चाळीतील जुनी विहीर,अशोक चौक येथील मार्कंडे गार्डन येथील विहीर आदी ठिकाणी सार्वजनिक व घरगुती गणेश मूर्तीच्या विसर्जनाची व्यवस्था करण्यात आली आहे. बुधवारी महापौर श्रीकांचना यन्नाम, पालिका आयुक्त पि.शिवशंकर, सभागृह नेते शिवानंद पाटील, विरोधी पक्षनेते अमोल शिंदे, मध्यवर्ती गणेशोत्सव महामंडळाचे अध्यक्ष नरसिंग मेंगजी, विजय पुकाळे, नगरसेवक नागेश भोगडे विविध विभागाचे झोन प्रमूख आदीनी शहराच्या विविध भागात निर्माण करण्यात आलेल्या विसर्जन कुंडाची पाहणी केली.दरम्यान नियोजित विसर्जन कुंडा पैकी गणपती घाट आणि अल्लमप्रभु घाटावर दुरूस्तीचे काम चालू असल्याने विष्णु घाट येथेच गणेश मुर्ती विसर्जन करण्या करिता परवानगी देण्याचा निर्णय घेण्यात आला.श्री गणेश विसर्जन करिता पालिका प्रशासना कडून नियोजन करण्यात आले आहे, शिवाय गणेश मुर्तीचे विसर्जन करताना विटंबना होणार नाही याची खबरदारी घेण्यात आली आहे.विधीवत शास्त्रशुद्ध पद्धतीने विसर्जन करण्यात येणार आहे.तसेच सोलापूर शहरातील नागरिकांनी गणपतीची विसर्जन आपल्या घरातच करावे घरात शक्य नसल्यास महापालिकेने नेमलेल्या ठिकाणी गणेश मूर्ती संकलन साठी द्यावे. गणेश भक्तानी देखील पालिका प्रशासनास सहकार्य करावे तसेच प्रत्येक मध्यवर्ती मंडळांनी आपल्या कडील स्वयंसेवक महापालिका द्यावे जेणेकरून महापालिका सहकार्य होईल असे मध्यवर्ती मंडळाना आवाहन महापौर श्रीकांचन यन्नम यांनी केले.महानगरपालिकेच्या वतीने कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी यंदाच्या गणेशोत्सवार काही निर्बंध घातले होते.महापालिकेच्या वतीने रविवारी होणा-या गणेश विसर्जन सोहळ्याचे नियोजन करण्यात आले असून तुळजापूर रोड जवळील एका खाणीत ,तसेच नेमून दिलेल्या विहिरीत या ठिकाणी मानवी साकळी पद्धतीने गणेशाच्या मुर्तीचे विधीवत शास्त्रशुद्ध पद्धतीने विसर्जन करण्यात येणार आहे, गणेश विसर्जन सोहळ्या करिता पालिका प्रशासनाकडून करण्यात आलेल्या नियोजनाचा शहरातील गणेश भक्तांनी लाभ घ्यावा आणि निर्विघ्नपणे विसर्जन सोहळा पार पडावा असे आवाहन महापालिका आयुक्त पि.शिवशंकर यांनी यावेळी केले.गेल्या वर्षी काही त्रुटी झाल्या होत्या यावेळी त्याचुका होऊ नये महापौर व आयुक्त यांनी या वर्षी विसर्जन साठी नियोजन चागल्या पध्दतीने केले आहे .प्रत्येक मध्यवर्ती मंडळांनी आपल्या कडील स्वयंसेवक महापालिका द्यावे जेणेकरून महापालिका सहकार्य होईल .सोलापूर शहरातील नागरिककांनी महापालिकेला सहकार्य करावे असे आवाहन सभागृह नेते शिवानंद पाटील यांनी केले. अधिकाधिक सुखद आणि सर्वाना सोईचे होईल असे नियोजन पालिका प्रशासनाकडून करण्यात आल्याचे सांगून गणेश मध्यवर्ती महामंडळाचे अध्यक्ष नरसिंग मेंगजी यांनी व्यक्त केले.यावेळी मध्यवर्ती मंडळाचे पदाधिकारी व महापालिका अधिकारी उपस्थित होते.