सोलापूर : सोलापूर महानगरपालिकेच्या मालकीची लक्ष्मी मंडई येथे स्मार्ट सिटी अंतर्गत विविध विकास कामे हाती घेण्यात आलेले आहे. लक्ष्मी मंडई येथे काही वर्षापासून अनेक गाळेधारक व ओटेधारक भाजी विक्री तसेच व्यवसाय करत आहेत. सदर ठिकाणी अस्तित्वात असलेले गाळेधारक व ओटेधारक यांना सदर मंडईमध्ये स्मार्ट सिटी माध्यमातून विकसित होणाऱ्या मंडईमध्ये पुनर्स्थापना कशाप्रकारे करण्यात येणार आहे. यासंबंधी माजी पालकमंत्री व आमदार विजयकुमार देशमुख व महापौर श्रीकांचना यन्नम आणि आयुक्त पी. शिवशंकर व संबंधित अधिकारी यांच्यासमवेत काल महापौर कार्यालय येथे बैठक घेण्यात आली होती. त्या अनुषंगाने आज सकाळी लक्ष्मी मंडई येथे महापौर श्रीकांचना यन्नम,विरोधी पक्षनेते महेश कोठे आणि आयुक्त पी.शिवशंकर , उपायुक्त जमीर लेंगरेकर, स्मार्ट सिटीचे मुख्य तांत्रिक अधिकारी संजय धनशेट्टी, लक्ष्मी मार्केट येथील ओठेधारक व गाळेधारक यांच्यासमवेत पाहणी करण्यात आली.यावेळी त्यांना येणाऱ्या अडचणी जाणून घेण्यात आले.या ठिकाणी मिर्ची व्यापारी यांनी महापौर व आयुक्त यांची भेट घेऊन त्याची समस्या मांडली यावेळी महापौर श्रीकांचना यन्नम यांनी या संदर्भात लवकरच आयुक्त व संबंधित अधिकारी यांची बैठक घेऊन निर्णय देऊ असे संगितले.