सोलापूर : अमृत योजने अंतर्गत चालू असलेल्या ड्रेनेज कामामुळे बुधवार पेठ, सम्राट चौक, परिसर कर्मवीर भाऊराव पाटील पुतळा परिसर, सम्राट पोलीस चौकी, श्राविका चौक ते बाळीवेस या भागातील रस्ते पूर्णपणे उघडण्यात आले असून सदर सम्राट चौक ते बाळीवेस चौक रस्त्यावर सध्या एकेरी वाहतूक चालू असून सदरच्या मार्गावर मार्केट, शाळा, कॉलेज व मुख्य व्यापारी तसेच बाजारपेठ असल्याने या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी होत असून रस्त्यावरील खड्डे व साचलेले पाणी यामुळे अपघात होण्याची शक्यता देखील नाकारता येत नाही त्यामुळे याठिकाणी नागरिकांचेही मोठी गैरसोय होत आहे तसेच पावसाळ्यामध्ये सम्राट चौक परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी साठत असल्याने गटनेते आनंद चंदनशिवे यांनी महापौर श्रीकांचना यन्नम यांना सम्राट चौक ते बाळीवेस मार्गाचे दुरावस्था व नागरिकांची होणारी अडचण आपण प्रत्यक्षात पहावे अशी विनंती केली.
यानुसार या भागाची आज पाहणी करण्यात आली सदर पाहणीनंतर महापौर श्रीकांचना यन्नम यांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना या भागातील ड्रेनेज काम लवकरात लवकर पूर्ण करून रस्त्याचे काम देखील पूर्ण करण्यासंबंधी आदेश दिले.
या पाहणीच्या वेळी महापौर श्रीकांचना यन्नम गटनेते आनंद चंदनशिवे अमृत योजनेचे अवेशक श्री डोंगरे नगरसेवक गणेश पुजारी विजय बमगोंडे, जी एम ग्रुप चे विश्वस्त व माजी अध्यक्ष अश्विन भैया सोनवणे, अवेशक बक्षी, राहुल म्हेत्रे, जिजप्पा वाघमारे, सोनू सुरते व परिसरातील नागरिक उपस्थित होते.