आज ८ मे रोजी इंडियन रेडक्रॉस सोसायटी सोलापूर ब्रांच, रोटरी क्लब ऑफ सोलापूर व रोटरी रेडक्रॉस थॅलेसेमिया सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक रेडक्रॉस दिवस व जागतिक थॅलेसेमिया दिवस सोलापूरात विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमाचे नेतृत्व चेअरमन डॉ. राजीव प्रधान, सचिव रो. जयेश पटेल, अध्यक्ष रो. सीए सुनील माहेश्वरी, डॉ. रो. ज्योती चिडगुपकर यांनी केले. रक्त संकलनासाठी गोपाबाई दमानी रक्त संकलन केंद्राचे थिटे मॅडम, सुचिता मॅडम, अभय कुलकर्णी, अंबलगी, तात्या, विठ्ठल व त्यांचा संपूर्ण स्टाफ यांनी उत्कृष्ट योगदान दिले. माजी संचालक केतन वोरा व डॉ. मंजरी कुलकर्णी यांचीही विशेष उपस्थिती होती.
मुख्य उपक्रम:
1. रक्तदान मोहीम: संस्थेचे अनेक मान्यवर रक्तदाते यांना फोन करून आमंत्रित करण्यात आले आणि तब्बल ४० दात्यांनी रक्तदान करून समाजाप्रती आपली जबाबदारी पार पाडली.
2. थॅलेसेमिया सेंटर उपक्रम: थॅलेसेमिया ग्रस्त मुलांना वाचनासाठी पुस्तके व खाऊचे वाटप करण्यात आले. भावसार व्हिजन इंडिया सोलापूरचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.
3. CBC अवेअरनेस उपक्रम: सोलापूरातील कॉलेज युवक-युवतींना “मुफ्त CBC करून घ्या” असे आवाहन करण्यात आले, ज्यामध्ये ३० पेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी सहभागी होऊन आपली थॅलेसेमिया स्थिती तपासून घेतली.
4. SMC बोर्ड लोकार्पण: सोलापूर महानगरपालिकेच्या विवाह नोंदणी कार्यालयात जनजागृतीसाठी मोठ्या बोर्डचे अनावरण उपायुक्त श्री. आशिष लोकरे, डॉ. मंजरी कुलकर्णी, डॉ. रो. ज्योती चिडगुपकर, रो. अध्यक्ष सीए सुनील महेश्वरी, रो. धनश्री केळकर, रो. शिवाजी उपरे यांच्या उपस्थितीत पार पडले. विशेष उल्लेखनीय म्हणजे नुकतेच विवाहबद्ध झालेल्या डॉ. जयंती अडके मॅडम यांच्या मुलाचे नवीन जोडपे देखील उपस्थित होते.
रेडकॉस आणि रोटरीच्या संयुक्त प्रयत्नांनी आजचा दिवस एक सामाजिक बांधिलकीचा व जनजागृतीचा प्रभावी अनुभव ठरला.