येस न्युज नेटवर्क : कोरोना रुग्णसंख्या पुन्हा झपाट्याने वाढतेय. मुंबई, दिल्ली, केरळ, उत्तर प्रदेशात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आढळत आहे. यामुळे केंद्रीय आरोग्य विभागाकडून सावध पवित्रा घेतला जात आहे. दिल्लीत एकाच दिवसात कोरोनाचे 2000 पेक्षा अधिक रुग्ण आढळून आले आहेत. याच पार्श्वभूमीवर आता दिल्ली सरकारकडून एक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे.
दिल्ली सरकारने सर्व सार्वजनिक ठिकाणी फेस मास्क घालणे सक्तीचे केले आहे, तर नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांकडून 500 रुपयांचा दंड आकरला जाईल. सरकारच्या अधिसूचनेनुसार, दंड खाजगी चारचाकी वाहनांमधून एकत्र प्रवास करणाऱ्या व्यक्तींना लागू हा नियम लागू होणार नाही. यामुळे दिल्लीत मेट्रो, बस आणि सार्वजनिक ठिकाणी विना मास्क प्रवास करणाऱ्या नागरिकांकडून दंड आकरला जाणार आहे. दंड आकारण्यासाठी रस्त्या -रस्त्यावर पुन्हा मार्शल उभे केले जाणार आहे.