सोलापूर— सोलापूर महानगरपालिका अंतर्गत माझी वसुंधरा अभियानाचे अनुषंगाने दिनांक 5 नोव्हेंबर ते 12 नोव्हेंबर पर्यत पक्षी सप्ताहाचा आयोजन करण्यात आले होते.आरण्यऋषी मारुती चितमपल्ली यांच्या जन्मदिनानिमित्त व स्व. पद्मभूषण डॉ.सलीम अली यांच्या जयंतीचे औचित्य साधून राज्य शासनाने जाहीर केलेल्या पक्षी सप्ताह सोलापूर शहरात राबविण्यात आले. त्या अनुषंगाने सोलापूर महानगरपालिका आणि GIB कोनझर्वेशन फ्रंट व विविध पर्यावरणीय संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने आज महापालिका परिसरात आरण्यऋषी मारुती चितमपल्ली यांच्या हस्ते पक्षाच्या छायाचित्रांच्या फिरते प्रदर्शनाचे समारोप करण्यात आले. यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून महापौर श्रीकांचना यन्नम,महापालिका आयुक्त पी.शिवशंकर, उपायुक्त धनराज पांडे,सहाय्यक आयुक्त विक्रम पाटील आदी मान्यवर उपस्थित. यावेळी महापौर श्रीकांचना यन्नम यांच्या हस्ते आरण्यऋषी मारुती चितमपल्ली याचं सत्कार केला.यावेळी पक्षांविषयी योजनाबद्ध जनजागृतीपर कार्यक्रम तसेच संवर्धन संरक्षण उपक्रम राबवण्यात आले तसेच डब्ल्यू सी एफ सोलापूर या संस्थेच्या वतीने सोलापूर शहरातील पक्षांची माहिती देणारा सुंदर लघुपट प्रदर्शित यावेळी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. या लघुपटाद्वारे सोलापूरकरांना पक्षांविषयी विषय आवड निर्माण होईल या करिता सदर लघुपट सोलापूर महानगरपालिका संकेतस्थळावर उपलब्ध करणेत आला आहे. सदर उपक्रम यशस्वी होणेकरिता पर्यावरण विभाग, सोमपा तसेच श्री पंकज चिंदरकर, शिवानंद हिरेमठ सर व राजकुमार कोळी यांचेकडून विशेष प्रयत्न करणेत आले.