येस न्युज मराठी नेटवर्क : दिपाली किशोर तुक्कुवाले या लोधी गल्लीत जुनी तालमीजवळ राहणाऱ्या विवाहित महिलेने पती किशोर तूक्कूवाले आणि रेहाना मौलाना शेख या बागवान नगर येथे राहणाऱ्या दोघांनी बेदम मारहाण केल्याची तक्रार केली आहे. दिपाली तुकुवले यांनी तक्रारीत म्हटले आहे की तेवीस मे 2010 रोजी विवाह झाल्यानंतर सहा महिने व्यवस्थित नोंदवण्यात आले. त्यानंतर माहेरच्या मंडळींकडून दहा लाख रुपये घेऊन ये अन्यथा सोडचिठ्ठी दे असे सांगत किशोर तुक्कुवाले याने शारीरिक व मानसिक छळ करण्यास सुरुवात केली .23 एप्रिल 2019 रोजी लोखंडी रॉडने मारहाण केली. तोंडात बोळा कोंबून भिंतीला धडक मारून जखमी केले, असे दिपाली हिने तक्रारीत म्हटले आहे सदर बाजार पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सोळुंके अधिक तपास करीत आहेत.