सोलापूर : प्रतिमा सचिन पवार या २८ वर्षाच्या विवाहितेने पती आणि सासरच्या लोकांविरुद्ध मानसिक छळ करून तसेच माहेर कडून पाच लाख रुपये घेऊन येण्यास सांगत त्रास दिल्याने फिर्याद दाखल केली आहे. विजापूर नाका पोलीस ठाणे मध्ये प्रतिमा पवार यांचे पती सचिन , सासू लता पवार, नणंद स्वाती लाड आणि दुसरी ननंद संध्या अमोल काशीद राहणार आंबेगाव पुणे अशा सर्वांविरुद्ध भारतीय दंड विधान कलम 498 ,323, 504 ,506 ,34 या प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे फिर्यादी प्रतिमा पवार हिने सासरच्या मंडळींनी जीवे मारण्याची धमकी दिली असेही म्हटले आहे.