• मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
Friday, May 9, 2025
  • Login
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

मराठा सेवा संघाचे १० मे पासून अकलूजमध्ये महाअधिवेशन…

by Yes News Marathi
May 7, 2025
in इतर घडामोडी
0
मराठा सेवा संघाचे १० मे पासून अकलूजमध्ये महाअधिवेशन…
0
SHARES
2
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

तीन दिवस चालणार विचारांचा जागर

सांस्कृतीक कार्यक्रम, व्याख्याने, काव्यसंमेलन,परिसंवाद

मराठा सेवा संघाचे महआधिवेशन घेण्याचा मान यावर्षी सोलापूरला मिळाला. शनिवार दि. 10 मे ते 12 मे दरम्यान अकलूज मधिल स.म.शंकरराव मोहिते पाटील स्मृती भवनमध्ये या राज्यस्तरीय महाअधिवेशनाचे आयोजन करण्यात आले आहे. या तीन दिवसात विचारांचा जागर चालणार आहे. सांस्कृतीक कार्यक्रम, व्याख्याने, काव्यसंमेलन,परिसंवादसह विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या आधिवेशनासला राज्यभरातून पदाधिकारी सभासद व समाज बांधव उपस्थित राहणार आहेत. साधारण पंधराशे लोक हजेरी लावतील. सर्वांची चहापान व भोजनाची व्यवस्था केली आहे तर राज्यभरातून येणाऱ्यांची मुक्कामाची सोय केली आहे

शनिवार दि. 10 मे रोजी दुपारी 2 वाजता माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांच्या हस्ते ,पालक मंत्री जयकुमार गोरे, मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष ॲड पुरुषोत्तम खेडेकर यांचे उपस्थितीत प्रदेशाध्याक्ष विजय घोगरे यांच्या अध्यक्षतेखाली, संपन्न होणार आहे. या उद्घाटन सोहळ्यास प्रमुख उपस्थित म्हणून अकलूज बाजार समितीचे सभापती तथा संमेलनाचे स्वागताध्यक्ष मदनसिंह मोहिते पाटील, खासदार धवलसिंह मोहिते पाटील, आमदार रणजितसिंह मोहिते पाटील, आमदार दिलीप सोपल, आमदार समाधान आवतडे, आमदार अभिजित पाटील, आमदार उत्तम जानकर, आमदार नारायणआबा पाटील, आमदार राजू खरे व सेवा संघाचे प्रदेश पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. उद्घटनपूर्व सत्रात सकाळी 11 वाजता मराठा सेवा संघ व 33 कक्ष बळकटीकरण व पुर्नबांधणी या विषयावर मराठा सेवा संघाचे संस्थापक पुरुषोत्तम खेडेकर मार्गदर्शन करणार आहेत. कार्यालयीन सचिव सोमनाथ लडके,धनंजय पाटील उपस्थित राहणार आहेत.

दुपारी 2 ते 2.30 वजाता शिवशाहीर राजेंद्र कांबळे यांचा शाहीरी कार्यक्रम, अकलूज इतिहास व विकास (डॉक्यूमेंट्री), महाराणी येसूबाई यांच्या जीवनावरील एकपात्री प्रयोग ’श्री राज्ञी सखी जयति’, आदी कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. सायंकाळी जिजाऊ ब्रिगेडच्या वतीने अकलूज शहरातून भव्य संस्कृती यात्रा व ग्रंथ दिंडीचे काढण्यात येणार आहे, रात्री ’जागर विचारांचा, जागर संस्कृतीचा’ या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

रविवारी दि. 1 मे रोजी सकाळी सूर्योदयाच्या कविता या अंतर्गत अनेक मान्यवर कवींच्या कविता सादर केल्या जातील, पुढील सत्रात प्रा. प्रेमकुमार बोके, अंजनगाव सुर्जी यांचे इतिहासाचार्य मा. म. देशमुख बहुजन इतिहास व प्रबोधनाचे अर्ध्वयू या विषयावर तसेच त्यानंतर प्रा. शरद पाटील यांची इतिहास मिमांसा आणि मार्क्स, फुले, आंबेडकरवाद यां विषयावर डॉ किशोर ढमाले यांचे व्याख्यान होणार आहे. तसेच बहुजन चळवळींचा समन्वय आवश्यकता आणि कृती कार्यक्रमा अंतर्गत प्राचार्य डॉ. दिलीप चौधरी, चंद्रपूर यांचे भाषण होणार आहे.

दुपारी व्याख्याते डॉ. अशोक राणा, यवतमाळ यांचे मराठा इतिहास आणि व्देषाचे राजकारण या विषयावर विशेष व्याख्यान होइल. व्याख्याते डॉ. सतिश तराळ अमरावती यांचे मराठा समाजाच्या सांस्कृतिकरणाची आवश्यकता या विषयावर व्याख्यान होणार आहे. त्यानंतर जीवन जगा आनंदाने, जीवन जगा मनसोक्त या विषयावर संजय कळमकर यांचे तर त्यानंतर प्रबोधनाची देशियता आणि वैश्विकता या विषयावर प्रा.डॉ. शरद बविस्कर यांचे व्याख्यान होणार आहे. सायंकाळी विजय चोरमारे यांचे माध्यम जगत आणि मराठा समाज या विषयावर तर निर्मलकुमार देशमुख यांचे आंतरराष्ट्रीय घडामोडी आणि मराठा सेवा संघ या विषयावर व्याख्यान होणार आहे. याच दिवशी रात्री गझल मैफल आयोजित करण्यात आली आहे.

सोमवार दि. 11 मे रोजी समारोप होणार आहे. यादिवशी सकाळी नवोदित कवींचे काव्यसंमेलन, त्यानंतर परिसंवाद होणार आहे. त्यानंतर नाचू किर्तनाचे रंगी या विषयावर गंगाधर बनबरेसरांचे व्याख्यान, दुपारी महिलांचे जग आणि जगणे या विषयावर स्नेहा टोम्पे, यवतमाळ यांचे व्याख्यान, त्यानंतर नित्य नवे कायदे, नित्य नवा संघर्ष या विषयावर अ‍ॅड. मिलिंद पवार, पुणे यांचे व्याख्यान, कला क्षेत्रातील जातवाद आणि बहुजन समाज या विषयावर किरण माने सिने कलाकार यांचे व्याख्यान होईल. समारोपीय सत्रात जिल्ह्यातील मान्यवर व्यक्तींना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे यामधे कला जोपासक जयसिंह उर्फ बाळदादा मोहिते पाटील, सामाजिक क्षेत्रात अक्कलकोट अन्नछत्रचे संस्थापक जन्मंज्येय भोसले, सिने क्षेत्रासाठी नागराज मंजुळे व किरण मने आणि शाहिरी कलेसाठी शिवशाहीर राजेंद्र कांबळे यांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. संध्याकाळी महिलांसाठी लावणी सम्राज्ञी सुरेखा पुणेकर यांचा लावणी उत्सव असे भरगच्च कार्यक्रम होणार आहेत.

१९९८ नंतर प्रथमच सोलापूर जिल्ह्यात मराठा सेवा संघाचे आधिवेशन होत आहे त्यामुळे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते अत्यंत उत्साहात तयारी करत आहेत. या निमित्ताने सोलापुरातील समाज बांधव व भगिनींना विचारांची आगळीवेगळी मेजवानी मिळणार आहे तरी जिल्ह्यातील युवक युवती, महिला व पुरुष यांनी आवरजुन उपस्थित राहवे असे आवाहन मराठा सेवा संघाच्यावतीने करण्यात आले

Previous Post

केतन वोरा यांची रेल्वे विभागीय वापरकर्ता समितीपदी निवड…

Next Post

येडेश्वरी मंदिरात आंबा आरास, महापूजेने भक्तिमय वातावरण…

Next Post
येडेश्वरी मंदिरात आंबा आरास, महापूजेने भक्तिमय वातावरण…

येडेश्वरी मंदिरात आंबा आरास, महापूजेने भक्तिमय वातावरण...

पत्ता:

© YES News Marathi ()

 अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र

 

Development And Support By DK Technos

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Join WhatsApp Group