सोलापूर : राजमाता जिजाऊ या स्वराज्य निर्मितीच्या प्रणेत्या होत्या, त्यांच्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज घडले, त्यांचा आदर्श सर्व युवती महिलांनी घ्यावा, असे मत जिल्हा परिषदेच्या प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांनी मांडले. जिल्हा परिषद मराठा सेवा संघ शाखेतर्फे राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेब यांच्या जयंतीनिमित्त जिल्हा परिषदेच्या सभागृहामध्ये आयोजित कर्तृत्ववान महिलांच्या सन्मानप्रसंगी त्या बोलत होत्या.
याप्रसंगी निवासी उपजिल्हाधिकारी शमा पवार, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर, मुख्य लेखा व वित्त अधिकारी अजयसिंह पवार, माध्यमिक शिक्षणाधिकारी सुलभा वठारे, प्राथमिक शिक्षणाधिकारी संजय जावीर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी इशाधिन शेळकंदे, कार्यकारी अभियंता दीपक कोळी, संतोष कुलकर्णी, डाँ. नवनाथ नरळे, मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष प्रशांत पाटील समन्वयक माऊली पवार , जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक सचिन जाधव आदी उपस्थित होते. प्रारंभी जिल्हा परिषद मराठा सेवा संघ शाखेचे अध्यक्ष अविनाश गोडसे यांनी उपस्थितांचे स्वागत केले. त्यानंतर वीज क्षेत्रात सन्मान केलेल्या कर्तुत्वान महिलांचा सन्मान करण्यात आला. यामध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे निवासी उपजिल्हाधिकारी क्षमा पवार, किड्स स्कूलच्या स्नेहा पाटील प्रयोगशाळा वैज्ञानिक फेजीया मुजावर अधिपरिचारिका आशा पाटील, पत्रकार प्रमिला चोरगी, अश्रि्वनी तडळवळर, माध्यमिक शिक्षणाधिकारी सुलभा वठारे, यांचा यावेळी सन्मान करण्यात आला. याप्रसंगी सीईओ आव्हाळे व निवासी उपजिल्हाधिकारी पवार यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना राजमाता जिजाऊ या स्वराज्य निर्मितीच्या प्रणेत्या होत्या, त्यांच्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज घडले, त्यांचा आदर्श सर्व युवती, महिलांनी घ्यावा असे आवाहन केले.
सूत्रसंचालन सरस्वती पवार यांनी केले. कार्यक्रमास कास्ट्राईब संघटनेचे जिल्हाध्यक्ष अरुण क्षीरसागर, राजेश देशपांडे, दिनेश बनसोडे, गिरीश जाधव, कर्मचारी युनियनचे अध्यक्ष तजमूल मुतवल्ली, दिव्यांग संघटनेचे लक्ष्मण वंजारी, जुनी पेन्शन संघटनेचे अध्यक्ष रामचंद्र शिंदे महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे अनिरुद्ध पवार व विविध संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी चेतन भोसले विकास भांगे, वासुदेव घाडगे अभिजीत निचळ, आप्पासाहेब भोसले, सचिन पवार, सचिन साळुंखे, सचिन चव्हाण, राम जगदाळे, विशाल घोगरे, गणेश साळुंखे, विकास भांगे सूर्यकांत मोहिते, नितीन पाटील, विष्णू पाटील,सुधाकर मानेदेशमुख,अविनाश भोसले, हरिभाऊ देशमुख, प्रशांत लंबे,अजय चव्हाण,उमेश खंडागळे जयंत पाटील सोनाली कदम, अश्रि्वनी सातपुते, सविता मिसाळ, प्रतिक्षा गोडसे,राहुल शिंदे, विष्णू पाटील, ऋषिकेश जाधव, अनुपमा पडवळे यांनी परिश्रम घेतले. यावेळी मान्यवरांच्या हस्ते मराठा सेवा संघाच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन करण्यात आले.
रक्तदान शिबिराला प्रतिसादा निमित्ताने आयोजित रक्तदान शिबिराला जोरदार प्रतिसाद मिळाला. तसेच आरोग्य तपासणी शिबिरात 125 जणांची नेत्र तपासणी करण्यात आली. यासाठी डॉ. बी.के. खजूरगी,एस. बी. नदाफ यांनी परिश्रम घेतले. तसेच जिजाऊ माँसाहेब यांची दूरदृष्टी या विषयावर प्रतीक्षा लामकाने, सानिका शिंदे, सांस्कृती गुरव, सानिका लामकाने यांचे व्याख्यान झाले.