येस न्युज मराठी नेटवर्क : मराठा समाजाने ५८ मूक मोर्चे काढल्यानंतर ही सरकार जागे होत नाही. म्हणून आता मराठा क्रांती ठोक मोर्चा आक्रोश पायी दिंडी घेऊन मंत्रालयावर धडकणार आहे. मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या पदाधिकार्थानी पंढरपूरातील पत्रकार परिषदेत माहिती दिली.
मराठा समाजाला मिळालेले आरक्षण उच्च न्यायालयात टिकले पण सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षणास स्थगिती मिळाली. त्यात ते घटना पीठा कडे सोपवले. यामुळे मराठा समाजातील तरूण ,विद्यार्थी यांचे नुकसान होत आहे. मराठा समाजाने ही बाब वेळोवेळी शासनाला सांगितली तरीही आरक्षणाकडे दुर्लक्ष होत आहे. मूक मोर्चा नंतर मराठा समाज आता आक्रोश करण्याच्या तयारीत आहे. ७ नोव्हेंबरला लाखो मराठा बांधव पंढरपूरातून संत नामदेव पायरी जवळ श्री विठ्ठल रुक्मिणीस साकडे घालून पायी दिंडी काढणार आहे. १९ दिवसांचा हा प्रवास असणार आहे. कोरोनाचे सर्व नियम पाळून, शांततेत हा मोर्चा निघेल.
मंत्रालयावर धडकल्यानंतर आम्ही कोणालाही भेटणार नाही. शासनाने भेट घेण्यासाठी यावे. आमची मागणी मान्य होईपर्यंत हे आंदोलन थांबणार नसल्याचा इशारा यावेळी दिला.