सोलापूर : भारतीय जनता युवा मोर्चाच्या प्रदेश उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल मनीष देशमुख यांचा भाजप नेते तथा के. के. प्रतिष्ठानचे अध्यक्ष सोमनाथ केंगळकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
मनीष देशमुख यांची नुकतीच भाजयुमोच्या प्रदेश उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली. त्याबद्दल विकासनगर येथील आमदार सुभाष देशमुख यांच्या संपर्क कार्यालयात त्यांच्या सत्काराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सोमनाथ केंगानाळकर यांनी मनीष देशमुख यांचा सत्कार करत त्यांना पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या. यावेळी राजेश मुगळे, सागर मुगळे, अक्षय अंजिखाने , दैदीप्य वडापूरकर, महेश देवकर यांच्यासह भाजपचे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.