सोलापूर : कितीही संकट आली तरी त्या संकटावर मात करत माणूस नावाचा प्राणी विविध उपायोजना करतोच. यंदाच्या वर्षी पावसाने कहर केला. लाखो हेक्टर पिकांचे नुकसान झाले साखर कारखान्यांचा गळीत हंगाम सुरू होतोय की लांबणीवर पडतोय अशी चिन्ह होती .तरीही या धो धो पडणाऱ्या पावसावर मात करत ऊसतोड कामगार सोलापूर जिल्ह्यात दाखल झाले आहेत .काल रात्री सोलापूर शहरात पहाटेपर्यंत धो धो पाऊस पडला तरीही या ऊसतोड कामगारांनी निसर्गावर मात करत आपल्या रोजी रोटीचा ऊस तोडीचा व्यवसाय सुरूच ठेवला आहे .सोलापूर शहरालगत असलेल्या बाळे देगाव रोडवरील बसवराज राजमाने यांच्या शेतातील हे सकारात्मक व्हिडिओ दृश्य डॉक्टर प्रवीण ननवरे यांनी शूट करून एस न्यूज मराठी ला पाठवले आहेत . कितीही संकट आली तरीही पाठीवरती थाप मारून फक्त लढ म्हणा असाच संदेश देणारी ही सकारात्मक बातमी…