येस न्युज मराठी नेटवर्क : पश्चिम बंगालमध्ये विधानसभेच्या निवडणुका तोंडावर आलेल्या असताना मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी सोमवारी मा की रसोई योजना सुरु केली आहे. पाच रुपयात गरिबांना दाल चावल भाजी आणि एक अँड असे भरपेट जेवण देण्यात येणार आहे. सध्या ही योजना कोलकात्त्यातील 16 बोरो ऑफिसमध्ये करण्यात येणार आहे .प्रत्येक ठिकाणी जवळपास एक हजार लोकांना दुपारचे भोजन पाच रुपयात मिळणार आहे. हळूहळू ही योजना कलकत्ता बाहेर देखील सुरू करण्यात येणार आहे.