सोलापूर – येथील राधाकिशन फोमरा मूकबधिर विद्यालय येथे महामानव भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त घेण्यात आलेल्या अभिवादनाच्या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.
विद्यार्थी दशेतच भवितव्यातील ध्येय गाठण्याची ताकद मुलांमध्ये आली पाहिजे. डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी शिक्षणाच्या जोरावरच ध्येय गाठले असे स्वप्न मुलांना दाखवा असेही ते म्हणाले.
प्रारंभी उपस्थितांचे स्वागत आणि प्रास्ताविक शाळेच्या मुख्याध्यापिका क्षितिजा गाताडे यांनी केले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन आणि दीपप्रज्वलन प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आले.
या प्रसंगी शाळेचे सचिव सुनील दावडा यांनी प्रमुख पाहुण्यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. तसेच दमानी अंध शाळेचे सचिव श्री संतोष भंडारी यांचा सत्कार रोटरी नॉर्थ च्या सचिवा जानवी माखीजा यांनी केला तसेच या प्रसंगी उपस्थित असलेले श्री अनिल गायकवाड यांचा सत्कार सुनील दावडा यांनी केला.
या कार्यक्रमास शाळेचे सचिव सुनील दावडा, दमानी अंध शाळेचे सचिव संतोष भंडारी, जानवी माखीजा, अनिल गायकवाड, युगंधर जिंदे, रेणुका पसपुलें, संध्या चंदनशिवे, विजया पिटालकर,गजानन गडगे, नागनाथ बसाटे, विठ्ठल सातपुते, चिदानंद बेनुरे सैफन बागवान, गंगाधर मदभावी,साहेब गौडा पाटील, सोमनाथ थोरात, बाबासाहेब पवार, आदी उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अजित पाटील यांनी केले तर आभार सचिव सुनील दावडा यांनी मानले.