तीन दिवसाआड पाणी पुरवठा करण्याचा आराखडा करा
आ. सुभाष देशमुख यांच्या आयुक्तांना सूचना
दक्षिणमधील विविध विकासकामांबाबत घेतली आढावा
सोलापूर – दक्षिण मतदारसंघातील काही भागात पाणीपुरवठा पाच ते सहा दिवसाआड होत आहे. तो तीन दिवसाआड करता येईल का याबाबत आराखडा तयार करा, जुन्या पाईल लाईन काढून नवीन टाकाव्यात, पाण्याची साठपण क्षमता वाढवण्यासाठी नवीन टाक्यांचा प्रस्ताव द्यावा, झोपडपट्टी भागात अंगणवाडी सुरू करा, प्रलंबित ड्रेनेजची कामे सुरू करा, प्राणी संग्रहालय विकसीत करू सुरू करा, सुंदरम नगर येथील जलतरण तलाव सुरू करा, यासह अनेक सूचन आ. सुभाष देशमुख यांनी महापालिका आयुक्त आणि अधिकार्यांना दिला.

मंगळवारी आमदार सुभाष देशमुख यांनी दक्षिण मधील शहरी भागात येणार्या विविध कामांबाबात आढावा बैठक घेतली. यावेळी सुमारे 20 विषयांवर प्रदिर्घ चर्चा करण्यात आली. मतदारसंघातील अनेक भागात कचरा साठला आहे, त्याची स्वच्छता करावी, छत्रपती नगर, डोणगांव रोड, हिमगिरी नगर, विश्वकिरण पार्क, शिवरत्न नगर, ममता नगर, जयमहालक्ष्मी नगर, रेणुका नगर, साईधन नगर, एस.टी. कॉलनी आदी भागातील ड्रेनेजची उर्वरीत भागात कामे करावीत, याशिवाय रस्त्यांची कामे अर्धवट आहेत तीही पूर्ण करावीत, सुंदरम नगर येथील जलतरण तलावाचा क्रीडा विभाग आणि महापालिकेचा वाद मिटवून ते नागरिकांसाठी खुले करावे, सोसायटी चेअरमनसोबत महापालिकेने बैठक घेऊन ज्या मोकळ्या जागा आहेत, त्या लोकसहभागातून विकसीत कराव्यात, जुळे सोलापुरात नाट्यगृहासाठी नवीन जागा द्यावी, पूर्वीची जागा वन विभागाची असल्याने तेथे नाट्यगृह बांधता येणार नाही, त्याच्या शेजारची जागा द्यावी, आसरा ते विजापूर रोड रस्ता मंजूर आहे तो सुरू करावा, त्वरित तेथे खडीकरण करावे आदी सूचना आ. देशमुख यांनी केल्या.
आ. देशमुख म्हणाले की, आयुक्त आणि त्यांच्या टीमने सर्व मागण्या ऐकून घेतल्या आहेत, तीन महिन्यात या पूर्ण करण्याचे आश्वासन त्यांनी दिले आहे. शिवाय एका महिन्यात पुन्हा एकदा आयुक्तांनी आढावा बैठक घेण्याचे सूचित केले आहे.
चौकट
प्रस्ताव्याच्या पाठपुराव्यासाठी प्रतिनिधीची मागणी
जी कामे करायची आहेत त्याबाबत प्रस्ताव तयार करण्याच्या सूचना दिल्या आहेत. तो महापालिकेने सरकारकडे पाठवावा आणि याचा पाठपुरवा करण्यासाठी महापालिकेचा एक स्वतंत्र प्रतिनिधी द्यावा जेणेकरून ही कामे लवकर होतील, अशाही सूचना आयुक्तांकडे केल्याचे आ. देशमुख म्हणाले.
आ. देशमुख यांनी केलेल्या आणखी मागण्या
पिण्याच्या पाणी पुरवठासाठी वापरात असलेल्या टाक्यांची स्वच्छत करावी, उत्कर्ष नगर, 2 नं. झोपडट्टी या भागात जुनी वापरात नसलेले सार्वजनिक शौचालये आहेत, त्याठिकाणी लोकोपयोगी कामे करावीत, निलम नगर येथे 100 बेडचे महिला प्रसुती गृह सुरु करण्याबाबत राज्य शासनास प्रस्ताव द्यावा, बंद असलेले हातपंप सुरू करावेत, उद्याने विकसीत करुन नागरिकांसाठी खुले करावीत, झोपडपट्टी भागातील गरिब मुलांसाठी अंगणवाडी सुरू कराव्यात, छत्रपती संभाजी तलाव विकसित करावा, एसआरपीएफ च्या बाजूला काही सोसायटी आहेत तेथे राहणार्या नागरिकांसाठी वहिवाटीचा रस्ता करून द्यावा, डी मार्ट परिसरात नवीन भाजी मंडई तयार करावी, चैतन्य भाजी मार्केट सध्या बंद अवस्थेत आहे ते विकसित करून चालू करावी .