आस्था रोटी बँक व आस्था फाउंडेशन तर्फे महिला दिनाच्या औचित्य साधून आस्था रोटी बँकेचे सर्वेसर्वा विजय छंचुरे यांनी महिला रत्न पुरस्कार देण्याची घोषणा केली.हे पुरस्कार देण्यामागचे उद्देश एवढाच की ज्याप्रमाणे सावित्रीबाई फुले राजमाता जिजाऊ तसेच अहिल्यादेवी होळकर इ स्त्रियांना समाजातील लोकांना घडविण्याचे कार्य ह्या महिलांनी समाजासमोर एक प्रेरणास्थान निर्माण केलेकठीण काळात कसे निर्धाराने संकटांना तोंड द्यायचे व कठीण परिस्थितीचा सामना कसे करायचे याचा आदर्श घालून देण्याचे कार्य या महिलांनी केलेले आहे.
त्यांचे प्रेरणा घेऊन इतर स्त्रियांनी संकटाशी सामना करावा.
आलेल्या कठीण परिस्थितीवर मात करावी व आपल्या समाजाचा विकास करावे हा उद्देश ठेवून महिला रत्न पुरस्कार देण्याचे घोषणा केले.
आज समाजामध्ये अनेक महिला उच्च पदावर कार्यरत आहेत त्या उच्च शिक्षण घेऊन वेगवेगळ्या उल्लेखनीय कामगिरी बजावत आहेत.
आजचा महिला रत्न पुरस्कार सुद्धा समाजातील विविध क्षेत्रातील संकटावर मात करून केलेल्या उल्लेखनीय कामगिरी पाडून हे पुरस्कार देण्यात सोलापूरच्या न्यायाधीश मिताली कोठुळे तसेच दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर नम्रता बिरादार , यांच्या अध्यक्षतेखाली ,
अधीक्षक मल्लिनाथ शहाबादे , ॲड नीता मंकणी , मल्लिकार्जुन आरकल , हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
प्रथम क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून दीप प्रज्वलन केले व मान्यवरांचा सत्कार तर दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर च्या नम्रता बिरादार ज्यांनी कार्यक्रमच विशेष आतिथी पद स्विकारून उपस्थित महिलांची मने जिंकली. सोलापुरातील कर्तव्यदक्ष महिलांचे सत्कार सोहळा ह.भ.प अरुंधती महाराज गवळी, संगीता जोगधनकर, अनिता माळगे, प्रेमिला चोरगी, कविता चव्हाण, रूपा चंद्रकुमार, आशा पाटील शहा, रजनी भाटिया , सुवर्णा गाडेकर , ममता कुलकर्णी, अमृता गुजले या महिलांचे सत्कार झालेले आहे
ह्या कार्यक्रमासाठी विजय छंचुरे, राजूभाऊ हौशट्टी, नीलिमा हिरेमठ, कांचन हिरेमठ, छाया गंगणे, योगेश कुंदुर, श्याम पाटील, विद्या माने, कल्पना कोळी,अनिता तालिकोटी, बाबा शिरशाडे, विकास कुंदूर, निसर्ग छंचुरे, या सर्वांचे सहकार्य लाभलेले आहे.
सूत्रसंचालन छाया गंगणे केले आभार प्रदर्शन श्याम पाटील यांनी केले.