लखनौ विमानतळावर प्रचंड धुके असल्याने एअर ॲम्बुलन्स आता टेक ऑफ करू शकत नाही. त्यामुळे #महेशकोठेयांचे_पार्थिव घेऊन निघणारे एअर ॲम्बुलन्स सकाळी सहा नंतर टेकऑफ घेईल व थेट सोलापूर विमानतळावर येईल. साधारण सकाळी नऊ नंतर एक तासभरासाठी अण्णांचे पार्थिव देह नागरिकांना अंत्यदर्शनासाठी जुना विडी घरकुल येथील संभाजीराव शिंदे प्रशालेच्या प्रांगणात ठेवण्यात येईल. त्यानंतर मुरारजी पेठ येथील ‘राधाश्री’ निवासस्थानी आणण्यात येईल. सकाळी 11 नंतर जुना पुना नाका येथील स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंतिम संस्कार करण्यात येतील.