मुरारजी पेठेतील निवासस्थानापासून निघणार अंत्ययात्रा
सोलापूर : माजी महापौर आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते महेश कोठे यांच्यावर उद्या सकाळी ११ वाजता जुना पुणे नाका येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार होणार आहेत. मुरारजी पेठेतील त्यांच्या निवासस्थानापासून अंत्ययात्रा काढण्यात येणार आहे.
महेश कोठे यांचे पार्थिव आज सायंकाळी ७ वाजता प्रयागराज येथून एअर ॲम्बुलन्सने पुण्याला आणण्यात येणार आहे. ही एअर ॲम्बुलन्स रात्री सुमारे १०.३० वाजता पुण्यात पोहोचणार असून तेथून महेश कोठे यांचे पार्थिव रुग्णवाहिकेतून उद्या पहाटे सोलापुरात पोहोचणार आहे. त्यांच्यावर उद्या सकाळी ११ वाजता जुना पुणे नाका येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येतील.