भाजपा उद्योग आघाडीचे प्रदेशाध्यक्ष प्रमोद वाखोडकर : देवेंद्र कोठे यांच्या प्रचारार्थ उद्योजकांचा मेळावा उत्साहात
सोलापूर : सोलापूर शहरात मोठ्या प्रमाणावर उद्योग यावेत यासाठी भाजपा आणि महायुती प्रयत्नशील आहे. शहरात औद्योगिक विकास व्हावा आणि त्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती व्हावी याकरिता महायुती आग्रही आहे, असे प्रतिपादन भारतीय जनता पार्टी उद्योग आघाडीचे प्रदेशाध्यक्ष प्रमोद वाखोडकर यांनी केले.
भाजपा शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस आरपीआयए आणि महायुतीचे शहर मध्य विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार देवेंद्र राजेश कोठे यांच्या प्रचारार्थ दुस्सा मंगल कार्यालय येथे उद्योजकांचा मेळावा उत्साहात झाला.
याप्रसंगी व्यासपीठावर भाजपा आणि महायुतीचे उमेदवार देवेंद्र कोठे, भाजपाचे शहर अध्यक्ष नरेंद्र काळे, शहर मध्य विधानसभा समन्वयक शिवानंद पाटील, उद्योग आघाडीच्या प्रदेश सरचिटणीस श्रद्धा कंदुडे, वस्त्रोद्योग धोरण समितीचे पेंटप्पा गड्डम, आघाडीचे पुणे अध्यक्ष पी. टी. काळे, शहर मध्य विधानसभा प्रचार प्रमुख राम तडवळकर, भाजपा इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स समितीचे महाराष्ट्र प्रदेश प्रमुख प्रशांत देशपांडे, भाजपा चित्रपट उद्योग निर्माता सेलचे प्रमुख डॉ. गोरख धोत्रे, उद्योग आघाडी कोकण विभाग संयोजक ओंकार हिरलेकर, भाजपा उद्योग आघाडीचे शहर अध्यक्ष अंबादास बिंगी, भाजपाचे माजी शहर अध्यक्ष रामचंद्र जन्नू उपस्थित होते.
प्रदेशाध्यक्ष वाखोडकर म्हणाले, सोलापूरसह राज्यभरातील विविध शहरांमध्ये स्थानिक महापालिका आणि एमआयडीसीबाबत काही समस्या आहेत. या समस्या सोडवण्यासाठी उद्योजक आणि कामगारांना अनुकूल धोरण तयार करून रोजगार विषयक प्रश्न मार्गी लावू. सोलापुरातील उद्योग रोजगार विषयक प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी भाजपा आणि महायुतीचे उमेदवार देवेंद्र राजेश कोठे यांच्या पाठीशी मतदार बांधवांनी ठामपणे उभे रहावे, असे आवाहनही श्री. वाखोडकर यांनी याप्रसंगी केले.
भाजपा उद्योग आघाडीच्या प्रदेश सरचिटणीस श्रद्धा कंदुडे म्हणाल्या, राज्य शासनाच्या कौशल्य विकास क्षेत्रात अनेक योजना आहेत. विशेषतः महिलांसाठीच्या योजना, रोजगार महिलांना मिळवण्यासाठी शासनाचे धोरण आगामी काळात राबविण्यात येईल.
यावेळी भाजपा उद्योग आघाडी कोकण विभागाचे सहसंयोजक अमरनाथ खुरपे, भाजपाचे सरचिटणीस पांडुरंग दिड्डी, रोहिणी तडवळकर, उपाध्यक्ष भूपती कमटम, चिटणीस नागेश सरगम, उद्योजक मुरलीधर आरकाल, दीनानाथ धुळम, मल्लिकार्जुन कमटम, श्रीनिवास गाली आदी उपस्थित होते. पेंटप्पा गड्डम यांनी प्रास्ताविक केले. नागेश सरगम यांनी सूत्रसंचालन तर अंबादास बिंगी यांनी आभार प्रदर्शन केले.
उद्योजक आणि कामगारांचे प्रश्न लावणार मार्गी
शहरातील औद्योगिक क्षेत्रातील उद्योगांचे प्रश्न तसेच कामगारांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी आगामी काळात शासन पातळीवरून सर्वतोपरी प्रयत्न करू.
— देवेंद्र कोठे, भाजपा आणि महायुतीचे शहर मध्य विधानसभेचे उमेदवार