येस न्युज मराठी नेटवर्क : माढा येथील मित्रप्रेम मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये महात्मा फुले जनआरोग्य योजना व प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेचा शुभारंभ आमदार प्रणिती शिंदे यांच्या हस्ते करण्यात आला.
सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील मित्रप्रेम मल्टीस्पेशालिटी चॅरिटेबल हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर माढा या हॉस्पिटल मध्ये महात्मा फुले जनआरोग्य योजना व प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेचा शुभारंभ आज महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी च्या कार्यध्यक्षा प्रणिती शिंदे यांच्या शुभहस्ते संपन्न झाला.
यावेळी धनाजीराव साठे, जिल्हा काँग्रेस नेते दादासाहेब साठे, माढा नगरपंचायतच्या नगराध्यक्षा मिनल साठे, महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षा शहीन शेख, हॉस्पिटलचे अधिक्षक डॉ.विकास मस्के यांच्यासह सर्व नगरसेवक,पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.