सोलापूर : यंदाची 66 वी महाराष्ट्र केसरी स्पर्धा पुणे जिल्ह्यातील लोणीकंद – फुलगाव येथील नेताजी सुभाषचंद्र बोस स्कूलच्या मैदानावर पार पडली. या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत महाराष्ट्र केसरी किताब 2023 चे मानकरी गंगावेस तालमीचा पैलवान सिकंदर शेख भव्य सत्कार जरिया फाउंडेशन चे संस्थापक अध्यक्ष नजीब शेख यांच्या वतीने भव्य सत्कार समारंभ करण्यात येणार आहे…
महाराष्ट्र केसरी पैलवान सिकंदर शेख यांचा माजी केंद्रीय गृहमंत्री माननीय सुशील कुमार शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली व सत्कार सोलापूर शहर मध्य विधानसभा आमदार माननीय प्रणिती शिंदे यांच्या शुभहस्ते भव्य सत्कार करण्यात येणार आहे.
जरिया फाउंडेशन या सामाजिक संस्थेच्या वतीने महाराष्ट्र केसरी पैलवान सिकंदर शेख यांचा स्वागत व सत्कार कार्यक्रम रविवारी दिनांक 2 डिसेंबर 2023 रोजी संध्याकाळी 7:00 ते 10: 00 वाजेपर्यंत होणार असून हा सत्कार समारोह
चे स्थळ : अचिवर्स हॉल नं : १, ४२/३ न्यू पाश्चा पेठ, पोलीस हेडकॉटर रोड, ग्रामीण पेट्रोल पंप समोर, सोलापूर. या ठिकाणी आयोजित करण्यात आले आहे.
सोलापूर शहरातील तसेच जिल्ह्यातील सर्व मान्यवरांना मित्रमंडळींना व शुभचिंतकांना विनंती आहे की आपण सर्वजण महाराष्ट्र केसरी पैलवान सिकंदर शेख यांच्या सत्कार समारंभास उपस्थित राहावे असे आवाहन नजीब भाई शेख यांनी केले आहे...