• मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
Tuesday, June 17, 2025
  • Login
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

महाराष्ट्र एप्रिल महिन्यात अधिक तापणार

by Yes News Marathi
March 31, 2022
in मुख्य बातमी
0
महाराष्ट्र एप्रिल महिन्यात अधिक तापणार
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

मुंबई : राज्यातील विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्र या भागांमध्ये उष्णतेचा कहर सुरु आहे. मार्च महिन्यात दोन वेळा उष्णतेची लाट आली. पण एप्रिल महिन्यातही नागरिकांची उन्हापासून सुटका होणार नाही. कारण हवामान विभागाने एप्रिल महिन्याचा अंदाज जारी केला असून त्यानुसार महाराष्ट्र एप्रिल महिन्यात अधिक तापणार असल्याचं सांगितलं आहे. येत्या महिन्यात महाराष्ट्रातील कमाल आणि किमान तापमान सरासरीपेक्षा अधिक राहण्याची शक्यता आहे. उत्तर महाराष्ट्र, पश्चिम विदर्भ, उत्तर कोकण, मराठवाड्यातील काही जिल्हे एप्रिलमध्ये अधिक तापणार आहेत. याशिवाय पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगली भागात तापमान सरासरी राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

कोकण, मध्य महाराष्ट्रात पावसाची शक्यता
दुसरीकडे कोकण, मध्य महाराष्ट्रात पावसाची देखील शक्यता आहे, आणि त्याचंही प्रमाण सरासरीपेक्षा जास्त राहण्याचा अंदाज आहे. उन्हाळ्यात प्रशांत महासागरातील laNina इफेक्ट कायम असणार आहे तर हिंद महासागरात आयओडी न्युट्रल स्थितीत असेल. त्यामुळे येणारा मान्सून देखील चांगला राहण्याची चिन्ह आहे.

2-3 दिवसात कमाल तापमानात सरासरीपेक्षा अधिक वाढ
दरम्यान पुढील काही दिवसात महाराष्ट्रातील तापमान 2 ते 3 अंश सेल्सिअसने वाढणार आहे. पुढील 2 ते 3 दिवस मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यातील काही ठिकाणी तर विदर्भात उष्णतेच्या लाटेचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. कमाल तापमानात सरासरीपेक्षा अधिक वाढ होणार आहे. अहमदनगर, जळगावमध्ये उष्णतेच्या लाटेच्या अंदाजासोबतच सोलापूर, जालना, परभणी आणि हिंगोलीत देखील उष्मघाताची शक्यता आहे.

Previous Post

यूपीए ही कोणाची खासगी मालमत्ता नाही : संजय राऊत

Next Post

अविवाहित मुलगी पालकांकडे लग्नाचा खर्च मागू शकते; हायकोर्टाचा निकाल

Next Post
अविवाहित मुलगी पालकांकडे लग्नाचा खर्च मागू शकते; हायकोर्टाचा निकाल

अविवाहित मुलगी पालकांकडे लग्नाचा खर्च मागू शकते; हायकोर्टाचा निकाल

पत्ता:

© YES News Marathi ()

 अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र

 

Development And Support By DK Technos

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Join WhatsApp Group