• मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
Wednesday, February 18, 2026
  • Login
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

लाडक्या दादासाठी महाराष्ट्र गहिवरला..लाखोंच्या अश्रूधारांनी अंत्यसंस्कार..!

by Yes News Marathi
January 29, 2026
in इतर घडामोडी
0
लाडक्या दादासाठी महाराष्ट्र गहिवरला..लाखोंच्या अश्रूधारांनी अंत्यसंस्कार..!
0
SHARES
2
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

महाराष्ट्राचे लाडके दादा आणि विद्यमान उपमुख्यमंत्री अजित पवार यांना आज बारामती मध्ये लाखोंच्या जनसमुदायाने अश्रूंच्या धारा गाळत जड अंतकरणाने अखेरचा निरोप दिला. दुपारी बारा वाजून दहा मिनिटांनी शासकीय बिगुल वाजवून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर अजितदादांचे सुपुत्र पार्थ आणि जय यांनी भडाग्नी दिला. यावेळी हवेत तीन वेळा फायरिंग करून अजित दादांना अखेरची सलामी देण्यात आली. काल बारामती येथील विमान अपघातात अजित पवार यांच्यासह पाच जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. आज सकाळी नऊ वाजता अंतयात्रेला प्रारंभ झाला. त्यांच्या मूळ गावी काटेवाडी येथे पार्थिव देह आल्यानंतर गावकऱ्यांना अश्रूचा बांध आवरता आला नाही. त्यानंतर विद्या प्रतिष्ठानच्या प्रांगणात अंत्यसंस्कार विधी पार पडला. यावेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, रामदास आठवले, विधानसभेचे सभापती राहुल नार्वेकर, राज ठाकरे, रितेश देशमुख, चंद्रशेखर बावनकुळे, चंद्रकांत पाटील, खासदार शाहू महाराज, काँग्रेसचे नेते सुशीलकुमार शिंदे यांच्यासह विविध मंत्री, खासदार, आमदार हे अंत्यविधीला उपस्थित होते. एकूणच गेल्या 30 तासापासून बारामती मध्ये लाखोंच्या जनसमुदायाने उपस्थित राहून अचानक एक्झिट केलेल्या अजित दादांना अखेरचा निरोप दिला. आता महाराष्ट्राच्या राजकारणातील दादा पर्व संपले असून ते फक्त आठवणीतच राहिले आहेत. सडेतोड.. हजर..जबाबी ..डॅशिंग.. आणि खमके नेतृत्व म्हणून नावलौकिक मिळवलेल्या अजितदादांना येस न्यूज मराठीची भावपूर्ण आदरांजली..

Previous Post

भाजपामध्ये तीन चुली; कार्यकर्ते संभ्रमात

Next Post

मुलीवरच अत्याचार करणाऱ्या नराधम पित्याला 20 वर्षे सक्तमजुरी

Next Post
मुलीवरच अत्याचार करणाऱ्या नराधम पित्याला 20 वर्षे सक्तमजुरी

मुलीवरच अत्याचार करणाऱ्या नराधम पित्याला 20 वर्षे सक्तमजुरी

पत्ता:

© YES News Marathi ()

 अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र

 

Development And Support By DK Technos

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In