महाराष्ट्र बँकेची सॅलरी खाते योजना…
सोलापूर : बँक ऑफ महाराष्ट्र केंद्र व राज्य सरकारी कर्मचारी प्राथमिक व माध्यमिक शिक्षक तसेच शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी सॅलरी खाते योजना सुरू केली आहे अशा खात्यांना वीस लाखापर्यंत वैयक्तिक कर्ज वाहन कर्जाच्या व्याजदरात आकर्षक सूट तसेच बँकेच्या इतर योजना प्राधान्याने देण्यात आल्या आहेत अशी माहिती सोलापूर विभागाच्या जनरल मॅनेजर सुनिता भोसले यांनी पत्रकार परिषदेत दिली. एटीएम कार्ड अंतर्गत दररोज ५० हजार रुपये काढता येणार असून कोणत्याही अतिरिक्त चार्जेस शिवाय अमर्यादित व्यवहार करता येणार आहेत. या पत्रकार परिषदेस जनरल मॅनेजर: सुनिता भोसले उप झोनल मॅनेजर : हेमंत महाजन आणि नोडल अधिकारी नितीन सातपुते उपस्थित होते.