सोलापूर : मयूर क्लासिक AC बँक्वेट हॉल येथे शुक्रवार दि. 27 ऑक्टोबर रोजी महाभोंडला कार्यक्रम अतिशय उत्साहात पार पडला. कार्यक्रमाचे संपूर्ण नियोजन स्पाईस एन आईस इव्हेंट्स यांनी केले होते. हत्तीच्या सुंदर रांगोळीभोवती जवळपास पाचशे महिलांनी गाणी म्हणत फेर धरला होता. सहभागी प्रत्येक महिलेला आकर्षक गिफ्ट आणि गिफ्ट कुपन्स देण्यात आले. विजेत्या महिलांना सुंदर बक्षीस देण्यात आले.
याप्रसंगी गरमागरम समोसा आणि दूध घेऊन उपस्थितांची मनं तृप्त झाली. महाभोंडला मध्ये… यंग जनरेशन व लहान मुले यांचा सहभाग उल्लेखनीय होता. क्वीन्स क्लब आणि BBN सोलापूरच्या महिलांनी या कार्यक्रमात खूप एंजॉय केले. आपल्या परंपरांना शास्त्रीय आधार आहे. पारंपारिक खेळ पुढच्या पिढीला माहीत असणे आणि रुजवणे खूप गरजेचे आहे. म्हणूनच BBN सोलापूर कार्यकर्ते आणि स्पाईस एन आईस इव्हेंट्स च्या टीमने कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी विशेष परिश्रम घेतले. सूत्रसंचालन प्रज्ञा सातपूरकर यांनी केलं. या कार्यक्रमासाठी ड्रीम होम किचन अप्लाएन्स, सर्वोदय भांडार, नवी पेठ, स्पाईस अँन्ड आईस इव्हेंट्स यांनी स्पाॅन्सरशिप दिली