सोलापूर : महाविकास आघाडी चे पदविधरचे अरुण लाड व शिक्षक चे उमेदवार जयंत आजगांवकर यांना प्रंचड मताने निवडून आणण्याचा निर्धार शिवसेना कॉंग्रेस राष्ट्रवादी यांच्या प्रमुख पदाधिकार्याच्या बैठकीत राष्ट्रवादी भवन भैय्याचौक येथे झालेल्या बैठकीत घेण्यात आले. प्रसंगी मागदर्शन करताना शिवसेना जिल्हाप्रमुख श्री पुरुषोत्तम बरडे यांनी म्हणाले की, पक्षप्रमुख व मुख्यमंत्री यांच्या आदेशाने महाविकास आघाडी च्या दोन्ही उमेदवारांना निवडून आणू आणी सर्व शिवसेना पदाधिकरांनी या दोन्ही उमेदवारां चा प्रचार करावे प्रत्येक मतदारांपर्यंत जाऊन त्यांना महाविकास आघाडीच्या उमेदवारांना मतदान करण्याचा विनंती केरा . तसेच काँग्रेसचे शहर अध्यस श्री प्रकाश वाले यांनी म्हणाले की, आपला विजय निश्चित आहे आपले मतभेद विसरून सर्व कॉग्रेस कार्यकर्तेंनी जोमाने कामाला लागावे. तसेच महाविकास आघाडीचे दोन्ही उमेदवारांना विजयी करू. या बैठकीत पुरुषोत्तम बरडे, महेश कोठे, प्रकाश वाले, संतोष पवार , गुरुशांत धुत्तरगांवकर, चेतन नरोटे, अमोल शिंदे, अमर पाटील, भिमाशंकर म्हेत्रे, संजय हेमगड्डी, जुबेर बागवान, शंकर चौगुले, उमेश गायकवाड, निरंजन बोध्दूल,भागवत जोगदनकर, रामदास मगर,भारतसिंग बडूरवाले, राजकुमार हंचाटे,राज पांढरे, धनराज जानकर, यांची प्रमुख उपस्थिती होते