सोलापूर – दरवर्षीप्रमाणे यंदाच्या वर्षीही थोरला मंगळवेढा तालीम सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या श्री गणरायाची महापूजा सोलापूर महानगरपालिका आरोग्य अधिकारी, सफाई कर्मचारी, सहाय्यक अभियंता , विद्युत विभागकर्मचारी, विभागीय अधिकारी, महिला सफाई कामगार, यांच्या शुभहस्ते करण्यात आली.
मंडळाच्या वतीने सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांना मानाचा फेटा बांधून त्यांचे स्वागत करण्यात आले, याप्रसंगी मंडळाचे आधारस्तंभ तथा शिवसेना जिल्हाप्रमुख अमोल बापू शिंदे, दत्तात्रय मेनकुदळे, उत्सव अध्यक्ष सुजित खुर्द, गौरव पिसे, विजय अवस्थी, उज्वल दीक्षित, अमित पवार, समर्थ कदम, खालील शेख, यशवंत कोळेकर, अमोल कदम, ऋषिकेश शिंदे, समीर मुजावर, किरण जाधव,कुणाल दीक्षित, गौरव खुर्द यांच्यासह मंडळाचे पदाधिकारी व असंख्य सदस्य उपस्थित होते.