भारतातील प्रथम शेती उपयोगी अवजाराचे असणार शोरूम
सोलापूर : मधुबन ट्रॅक्टर्स बार्शी येथे जॉन डीअर कंपनीचे ग्रीन सिस्टम हे स्वतंत्र शेती उपयोगी अवजार व उपकरण बनवणाऱ्या शोरूमचे उद्घाटन जॉन डीअर इंडिया प्रायव्हेट लिमिटेड चे झोनल बिझनेस मॅनेजर राजेश लिंगमपल्ली यांच्या हस्ते संपन्न झाले. तसेच राजेश लिंगमपल्ली यांच्या हस्ते मधुबन ट्रॅक्टर्स च्या नवीन लोगोचे अनावरण करण्यात आले.
यावेळी व्यासपीठावर जॉन डीअर इंडिया प्रायव्हेट लिमिटेड चे प्रोडक्शन सिस्टम जनरल मॅनेजर संदीप अवसरे, एरिया मॅनेजर एम.एच.-२ अंकित सक्सेना, एरिया बिझनेस मॅनेजर जॉन डियर फायनान्स राकेश कुमार, मॅनेजर सेल्स अँड मार्केटिंग सोमनाथ कोकरे, असिस्टंट एरिया मॅनेजर कैलास तासकर, टेरिटरी कस्टमर सपोर्ट राजेश पाटील, स्टील इंडिया प्रायव्हेट लिमिटेड चे नॅशनल सेल्स मॅनेजर संजय वशिष्ठ, रिजनल मॅनेजर मनू चिंतन, टेरिटरी सेल्स मॅनेजर भूषण पाटील, डॉ.नवनाथ कसपटे, मधुबन ट्रॅक्टरचे चेअरमन प्रवीण कसपटे, प्रमुख व्यवस्थापक माणिक हजारे, ॲड. विक्रम सावळे, कृषी सहाय्यक गणेश पाटील, उद्योजक अतुल सोनीग्रा, इंडसइंड बँकेचे झोनल मॅनेजर प्रमोद यादव, लायन्स क्लब बार्शी टाउन चे अध्यक्ष अमित कटारिया, शेती मित्राचे संपादक प्रमोद पाटील आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना माणिक हजारे यांनी सन 1985 पासून मधुबन परिवाराचा इतिहास सर्वांना सांगितला त्याचबरोबर मधुबन ट्रॅक्टरची सुरुवात सन 2009 मध्ये जेमतेम एक ब्रांच आणि चार कामगार यांच्यासोबत झाली होती त्याचे रूपांतर आता बारा शाखा आणि दीडशे पेक्षा जास्त कामगार यामध्ये रूपांतर झालेला आहे तसेच संपूर्ण मधुबन परिवाराच्या माध्यमातून 500 पेक्षा जास्त कुटुंबाचे उदरनिर्वाह भागविण्याचे भाग्य मधुबन परिवाराला मिळाले असेही त्यांनी नमूद केले. अंकित सक्सेना यांनी महाराष्ट्र मध्ये मधुबन ट्रॅक्टर्स डीलरशिप सर्वात मोठी असून कंपनी नेहमी चांगल्या उपक्रमासाठी आपल्या पाठीशी असेल असे आश्वासन दिले. ॲड. विक्रम सावळे यांनी सांगितले की जॉन डीअर कंपनी ही जगातील ट्रॅक्टर इंडस्ट्री मधली जुनी कंपनी असून दर्जेदार प्रोडक्ट बनवते व अशाच दर्जेदार प्रोडक्टची विक्री करणारे मधुबन ट्रॅक्टर्स ही सुद्धा एक दर्जेदार डीलरशिप आहे असे सांगितले. कैलास तासकर व राजेश पाटील यांनी ग्रीन सिस्टमच्या सर्व अवजाराचे माहिती सांगणारे प्रेझेंटेशन सादर केले. कृषी सहाय्यक गणेश पाटील यांनी शासकीय योजनांमध्ये कोणत्या अवजारांचा समावेश होतो याची माहिती उपस्थित शेतकऱ्यांना दिली. संजय वशिष्ठ यांनी स्टील सारखे दर्जेदार प्रोडक्ट शेतकऱ्यांनी पहावे त्याचा अनुभव घ्यावा आणि मगच खरेदी करावे असे आवाहन केले. राकेश कुमार यांनी ग्रीन सिस्टमच्या अवजारावर देखील जॉन डीअर फायनान्स पुरेसे कर्ज देईल असे विचार व्यक्त केले.
यावेळी बोलताना राजेश लिंगमपल्ली यांनी जॉन डीअर कंपनी ही नेहमीच शेतकऱ्यांचा प्राधान्याने विचार करते व सर्व समावेशक असे प्रॉडक्ट बनवते असे सांगितले व मधुबन ट्रॅक्टर नेहमीच चांगल्या सेवा देत आले आहे कंपनी सुद्धा मधुबन ट्रॅक्टरला नेहमी सहकार्य करण्यासाठी पुढे असेल असे मत व्यक्त केले. भारतात प्रथमच होत असलेल्या या शोरूमचे डिझाईन बनविणाऱ्या अश्विनी महिंद्रकर यांचा देखील या निमित्ताने सन्मान करण्यात आला.
या उद्घाटनाच्या निमित्ताने नवीन 22 ग्राहकांना जॉन डीअर ट्रॅक्टर ची चावी मान्यवरांच्या हस्ते सुपूर्द करण्यात आली. तसेच ग्रीन सिस्टमचे तीन अवजार नवीन ग्राहकांनी खरेदी केले व स्टील कंपनीचे एक अवजार ग्राहकांनी खरेदी केले. या उद्घाटनाच्या निमित्ताने 5405 या 63 एच.पी. ट्रॅक्टरचे जॉन डीअर चे सर्वात जुने ग्राहक कल्याण फरतडे यांच्या हस्ते लॉन्चिंग करण्यात आले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मधुबन ट्रॅक्टर्स च्या सर्व टीमने परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नरेश ठाकूर यांनी केले तर आभार मधुबन ट्रॅक्टरचे चेअरमन प्रवीण कसपटे यांनी मानले.