येथील सोलापूर शहरातील नामवंत एम.आय.टी. विश्वशांती गुरुकुल स्कूलचे भारतीय प्रतिभा(इंडियन टॅलेन्ट) ऑलिम्पियाड परीक्षेत विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले आहे शाळेतील एकूण शंभर विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता त्यापैकी वरद गायकवाड – राज्य टॉपर (ड्रॉइंग)-रु. १००० शिष्यवृत्ती व शरवाणी भैरप्पा – राज्य टॉपर (ड्रॉइंग)-रु. ७०० शिष्यवृत्ती मिळाली असून सिद्धार्थ पाटील, अलिशा माने,सृष्टी दिवटे या विद्यार्थ्यांनी गणित आणि विज्ञानात विषयातील उत्कृष्टता पदक मिळवले तर १० विद्यार्थ्यांनी सुवर्णपदक मिळवले आहे. त्यांच्या या यशाबद्दल शाळेचे प्राचार्य मनीष पुराणी यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले व जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी आशा स्पर्धा परीक्षा दिल्या पाहिजेत असे सांगितले.या सर्व विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा विभागाच्या समन्वयिका नमिता अथनीकर, संजय तट्टे,श्रीशैल हडपद, रमेश मेटकरी, अंजली कुंभार आदींनी मार्गदर्शन केले.