वैरागहुन पाकणीकडे जाणाऱ्या पिकअपला लक्झरी बसने बाजूने कट मारल्याने पिकअप रोडच्या कडेला खड्ड्यात पडून यातील एका वृद्ध प्रवासी महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला तर अन्य 13 प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. हा अपघात मंगळवारी सकाळी सव्वा आठच्या सुमारास सावळेश्वर जवळील पठाण बाबा दर्गाजवळ घडला. बार्शी तालुक्यातील डोराळे येथील राहणारे वत्सला नारायण चवरे असे उपचारादरम्यान मृत्यू झालेल्या वृद्धेचे नाव आहे. जखमींना सोलापुरातील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

