नवी दिल्ली : इंधनाच्या चढ्या किमतींमुळे त्रस्त असलेल्या ग्राहकांना मोठा दिलासा देत OMC ने मंगळवार म्हणजेच १ नोव्हेंबरपासून व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या किमतीत कपात करण्याची घोषणा केली आहे. नवीन दर १ नोव्हेंबर २०२२ पासून प्रभावी असतील. यानुसार १९ किलोच्या व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या दरात प्रति सिलेंडर ११५.५० रुपयांनी कपात करण्यात आली आहे. दरम्यान, घरगुती स्वयंपाकाच्या गॅसच्या दरांमध्ये कोणताही बदल नसला तरी आंतरराष्ट्रीय किमती कमी करण्याचे फायदे OMC ने ग्राहकांना दिले आहेत.
इंडियन ऑइलने मंगळवार, १ नोव्हेंबर रोजी एलपीजीचे नवीन दर जाहीर केले आहेत. त्यानुसार आजपासून १९ किलोच्या व्यावसायिक सिलेंडरची किंमत दिल्लीत ११५.५ रुपये, कोलकात्यात ११३ रुपये, मुंबईत ११५.५ रुपये आणि चेन्नईमध्ये ११६.५ रुपयांनी कमी झाली आहे. याशिवाय ६ जुलै २०२२ नंतर घरगुती सिलिंडरच्या किमतीत कोणताही बदल झालेला नाही.