येस न्युज मराठी नेटवर्क ; ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांच्या निधनानंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार भावूक झाले. दिलीप कुमार यांच्या निधनाची बातमी ऐकून दुःखी झालो. आम्ही एक महानायक गमावला, अशा भावना शरद पवार यांनी ट्विटरवरून व्यक्त केल्या. तसंच दिलीप कुमार यांच्या कुटुंबियांप्रती आणि त्यांच्या चाहत्यांप्रति पवारांनी सहवेदना व्यक्त केल्या. दिलीप कुमार यांनी वयाच्या 98 व्या वर्षी मुंबईतील हिंदुजा रुग्णालयात आज सकाळी साडे सात वाजण्याच्या अखेरचा श्वास घेतला आहे.