सोलापूर : राजकीय, सामाजिक, शैक्षणिक अशा सर्वच क्षेत्रामध्ये नावलौकिक मिळवत, शुन्यातून विश्व निर्माण करणाऱ्या मनोहर सपाटे यांना दीर्घायुष्य लाभावे, त्यांच्या हातून जनतेची आणखी सेवा घडावी, असे प्रतिपादन राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बळीराम साठे यांनी केले. मनोहर सपाटे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित सत्कार समारंभात ते बोलत होते.
यावेळी माजी मंत्री दिलीप सोपल, अॅड. यु.एन.बेरिया, सुधीर खरटमल, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष भारत जाधव, काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतन नरोटे, महेश कोठे, शिंदे सेनेचे जिल्हाध्यक्ष अमोल शिंदे, उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेचे जिल्हाध्यक्ष गणेश वानकर, बिजू प्रधाने, पद्माकर काळे, जुबेर बागवान, आयुब शेख, जावेद शेख, महादेव गवळी, एकनाथ घाडगे, राष्ट्रवादीच्या महिलाध्यक्षा सुनिता रोटे, लता ढेरे, नलिनी चंदिले, सुधा अळ्ळीमोरे आदींसह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. आज संस्था आणि संस्थापकाचा वाढदिवस आहे. स्वकर्तुत्वावर नगरसेवक ते महापौर अशी झेप घेणारे सपाटे हे राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांचे एकनिष्ठ कार्यकर्ते आहेत. संघर्षमय जीवन जगत सर्वसामान्यांचा आधारवड बनलेले सपाटे हे दिलदार व्यक्तिमत्व आहे.
एखाद्या क्षेत्रात वाहून न जाता, त्या क्षेत्राला वाहून घेतलेली व्यक्ती म्हणजे मनोहर सपाटे आहेत. अशा शब्दात दिलीप सोपल यांनी त्यांचा गौरव केला. महेश कोठे, गणेश वानकर, अमोल शिंदे, आदींसह मान्यवरांनी त्यांना आपल्या भाषणातून शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविक ज्ञानेश्वर सपाटे यांनी केले. तर आभार प्राचार्य अनिल बारबोले यांनी मानले.
पवार इज पॉवर हे सर्वांना कळले
राजकारणात कोणी कोणाला कितीही विरोध केला तरी, एकाच व्यासपीठावर सर्वांना आणण्याची ताकद ही शरद पवारांमध्येच आहे. महेश कोठे आणि माझं सापा मुंगसाचे वैर होतं. पण, आम्हाला एकत्र आणण्याचं काम पवार साहेबांनी केलं आहे. त्यामुळे ‘पवार इज पॉवर’ हे आता सर्वांनाच कळले आहे. असे मत सत्कारमूर्ती मनोहर सपाटे यांनी व्यक्त केले.