सोलापूर : सोलापुरातील लोकमंगल राज्यस्तरीय साहित्य पुरस्कार आज जाहीर करण्यात आले. तो उंच माणूस साठी विजय पाडळकर नांदेड यांना पहिला पुरस्कार जाहीर झाला आहे. तर क्रणानुबंधसाठी डॉ. बाळ फोंडके पुणे यांना द्वितीय आणि एका कादंबरीची गोष्ट रमेश इंगळे बुलढाणा यांना तिसरा पुरस्कार जाहीर झाला आहे. २५ हजार रुपये रोख, स्मृतीचिन्ह असं पुरस्काराचं स्वरूप आहे. साहित्य क्षेत्रातील लक्षणीय कार्याबद्दल दिला जाणारा पुरस्कार संशोधक डॉ. मोहम्मद आझम मुंबई मुळगाव मैंदर्गी तालुका अक्कलकोट यांना दखनीचा आद्य काव्यग्रंथ यासाठी जाहीर करण्यात आला.
हे. सोलापुरी साहित्याला देण्यात येणारा पुरस्कार प्रा. राजेंद्र दास कुईूवाडी यांना जाहीर झाला आहे. या पुरस्काराचे वितरण रविवार दिनांक ८ जानेवारी रोजी सायंकाळी ६ वाजता किर्लोस्कर सभागृह हि.ने वाचनालय येथे होणार आहे. ज्येष्ठ समीक्षक प्रा. अविनाश सप्रे यांच्या हस्ते पुरस्कार वितरण होणार असून प्रमुख पाहुणे म्हणून सिने कलावंत मृणाल कुलकर्णी-देब या उपस्थित राहणार आहेत. आज पत्रकार परिषदेत ही माहिती देण्यात आली. यावेळी निवड समितीचे सदस्य नितीन वैद्य, ऋचा कांबळे, शिरीष देखणे, दत्ता घोलप तसेच समन्वयक शोभा बोली या उपस्थित होत्या.