शनिवार दि. २० जानेवारी २०२४ रोजी लोकमंगल नागरी सहकारी पतसंस्थेच्या वैराग शाखेचा स्वमलकीच्या जागेत स्थलांतर व नवीन इमारतीच्या उद्घाटनाचा कार्यक्रम संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आ. सुभाष देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून वैराग पोलीस स्टेशन चे पोलीस उपनिरीक्षक अमोल बामणे, ह.भ.प. ज्ञानेश्वर रणशुर (नंदू महाराज वैरागकर) उपस्थित होते.
यावेळी बोलताना आ. सुभाष देशमुख म्हणाले की, अल्पावधीतच आपण दाखविलेला विश्वास यामुळे वैराग शाखा १०० कोटी व्यवसायाकडे वाटचाल करत आहे. त्यामुळे संस्था वाढीसाठी वैराग शखेचे विशेष महत्त्व आहे.
प्रारंभी संस्थेचे चेअरमन गुरण्णा तेली यांनी प्रास्ताविकामध्ये पतसंस्था ६३ शाखेमधून सेवा देत २२०० कोटींची व्यवसायपूर्ती केल्याचे सांगितले.
यावेळी व्हा. चेअरमन निर्मला कुंभार, कार्यकारी संचालक मनिष देशमुख, सरव्यवस्थापिका अलका देवडकर व सर्व संचालक उपस्थित होते. याप्रसंगी काही सभासद व कर्जदार यांचा सन्मान करण्यात आला यामध्ये प्रताप पाटील, हरि पवार, लक्ष्मण सुरवसे, पद्माकर माने आदी सभासद व उत्कृष्ट कर्जदार यांचा सन्मान करण्यात आला याबरोबरच वैराग शाखेची उत्कृष्ट इमारत बांधकाम पूर्ण करणेकामी सहकार्य लाभलेले संस्थेचे संचालक समाधान पाटील यांचा विशेष सन्मान करण्यात आला.
कार्यक्रम प्रसंगी तज्ञ संचालक ॲड. गजानन भाकरे, संचालक युवराज गायकवाड, सल्लागार संतोष जाधव, ह.भ.प. नंदू महाराज वैरागकर यांनी आपले मनोगत व्यक्त करून संस्थेच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. त्यानंतर संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आ. सुभाष देशमुख यांनी उपस्थित सभासद, खातेदार यांना मार्गदर्शन केले. यावेळी वैराग परिसरातील व पंचक्रोशीतील बहूसंख्य सभासद, ठेवीदार, कर्जदार व हितचिंतक उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन सतिश लोंढे यांनी केले तर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विभागीय अधिकारी, शाखाधिकारी व सर्व कर्मचाऱ्यांनी विशेष प्रयत्न केले.