सोलापूर : लोकमंगल फाऊंडेशनडेशनतर्फे विविध ठिकाणी महिला दिनानिमित्त विविध क्षेत्रात काम करणार्या महिलांचा सत्कार करण्यात आला. सहयोग नगर, शिवरत्न नगर, विशाल,वीरशैव नंगर येथील कार्यक्रम प्रा. प्रा.मधुरा वडापूरकर, यांच्या उपस्थितीत पार पडला यावेळी उखाणे स्पर्धा घेण्यात आली. यावेळी विविधि क्षेत्रात काम करणार्या हासिनी कुलकर्णी, आरती अमोल यादव, डॉ.मेघना अशोक जाधव, प्रा. अंजली मधुकर कोळी, संगीता भागवत भोसले , रश्मी विशाल गायकवाड आदींचा गौरव करण्यात आला. सरस्वती पाटील यांनी सूत्रसंचालन केले. विजय नगर, संतोष नगर येथील कार्यक्रमात शशिकला कलशेट्टी, मिनाक्षी मेंदाळे, अनिता दसूर, प्रा. प्रिया सुरवसे आदी महिलांचा सत्कार करण्यात आला. यावेळी लोकमंगल मल्टीस्टेच्या व्यवस्थापिका नाजमिन शेख, ज्योती जानकर, प्रा. ज्योती बक्षी आदींची प्रमुख उपस्थिती होती. भाग्यश्री जोशी यांनी सूत्रसंचालन केले.